
निमा वुमन फोरम तर्फे सन फार्मा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (नागपूर ) येथे इयत्ता ११ वी व १२ वी मधील विद्यार्थ्यांना आरोग्यपूरक आहार ,व्यायाम व निद्रा या त्रिसूत्रीचे जीवनातील महत्व या विषयी अध्यक्षा Dr रत्ना बल्लाळ यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. प्रियांका मोटे यांनीही या वेळी मुलांना मार्गदर्शन केले..पुढील आयुष्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आत्ताच विचारांचा पाया पक्का करून ध्येय प्राप्ती करा असे सांगितले..यावेळी डाॅ. कल्पना कदम याही उपस्थित होत्या.. या कार्यक्रमात एकूण ५० विद्यार्थी उपस्थित होते.
शाळेच्या प्रमुख गुंड मॅडम यांनी सत्कार करून आभार मानले..