ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

दगडाने ठेचून तरुणाचा खुन करणाऱ्या आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी केले अवघ्या १२ तासाच्या आतच जेरबंद

अहिल्यानगर

बोल्हेगाव फाटा येथे दगडाने तरुणाचा खून करून पसार झालेल्या आरोपीस पकडण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे हे कारवाई पोलिसांनी अवघ्या १२ तासाच्या आत केली आहे.

यातील मयत यांची पत्नीने सदरील घडलेल्या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचे दोन पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन करून आरोपी पकडण्यास रवाना केले.गुन्हा घडला त्या ठिकाणी पोलीस सीसीटीव्ही फुटेज चेक करत असताना सपोनी.माणिक चौधरी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरील गुन्हा हा भास्कर विठ्ठलराव देशमुख रा. वाळुंज ता. जि. अहिल्यानगर याने केला असून तो सध्या आष्टी जि.बीड येथे आहे. खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस पथकाने बीडमध्ये जाऊन आरोपीचा सीताफिने तपास करत आरोपीला अटक केली.

पकडलेल्या आरोपीस गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की मयत अश्विन कांबळे यांनी दारू पिऊन शिवीगाळ केल्याने मी त्याच्या डोक्यात दगड घालून त्यास जीवे ठार मारले आहे अशी कबुली दिली.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी ग्रामीण विभाग संपतराव भोसले,यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि. माणिक चौधरी,पोउनि. विनोद परदेशी,पोउनि.विकास जाधव,पोउनि.मनोज मोंढे,पोहेकॉ.नंदकिशोर सांगळे,नितीन उगलमुगले,साबीर शेख, कावरे,राजू सुद्रिक, महेश बोरुडे,किशोर जाधव,सुरज देशमुख, जयसिंग शिंदे,नवनाथ दहिफळे,उमेश शेरकर, अक्षय रोहकले,सानप, गवारे, तसेच दक्षिण मोबाईल सेलचे पोकॉ. राहुल गुंडू यांनी केली आहे.

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे