ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

चिमुकल्यांनी केला गजर हरिनामाचा… विद्यार्थ्यांसह पालकांनी अनुभवला सोहळा वारीचा ॥

अहिल्यानगर

परिवर्तन प्रतिष्ठान संचलित पालवी शिशुविहार, बालक मंदिर महिला मंडळ , आनंदभूमी यांनी रविवार दि. ५ जानेवारी २०२५ रोजी ऊर्जा गुरुकुल सभागृह, केडगांव याठिकाणी स्नेहसंमेलन आयोजित केले होते.

“जाऊ संतांचिया गावा” या संकल्पनेवर आधारीत या स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नाट्यकर्मी मा श्री पी. डी. कुलकर्णी होते. प्रमुख पाहुणे म्हणून म.न.पा. प्रशासनाधिकारी साहेब मा. श्री. जुबेरजी पठाण तसेच शाळेचे माजी विद्यार्थी असलेले प्रसिद्ध उद्योजक श्री प्रफुल्लजी नातू उपस्थित होते.

यावेळी संस्कारित वातावरण घर आणि शाळा दोन्ही ठिकाणी असायला हवे. सध्या शाळांमध्ये आणि पालकांमध्ये जे स्पर्धेचे वातावरण असते ते विद्यार्थ्यांसाठी अतिशय हानीकारक असल्याचे श्री. जुबेरजी पठाण म्हणाले. श्री. प्रफुल्लजी नातू यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करतांना त्यांच्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला. अशा शाळा या मुलांना सर्वोत्तम माणूस म्हणून घडवतात असे ते म्हणाले. श्री. पी. डी. कुलकर्णी यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात मुलांना मातृभाषेतूनच शिक्षण देण्याचा मुद्दा अधोरेखित केला. मुलांना स्वतःचे उत्कृष्ट व्यक्तिमत्व घडवण्यासाठी पालकांनी मदत करावी असे मत त्यांनी व्यक्त केले. मुलं आपल्या संस्कृतीपासून दूर जाणार नाहीत याची फार मोठी जबाबदारी शाळा आणि घराची आहे असे सांगून संत परंपरा या संकल्पनेवर आधारीत स्नेहसंमेलन ठरविल्याबद्दल त्यांनी परिवर्तन प्रतिष्ठानचे अभिनंदन केले.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिवर्तन प्रतिष्ठानचे सचिव डॉ. श्री. अनिकेत घोटणकर यांनी केले. यावेळी परिवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. रविंद्र करंदीकर, महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. ज्योतीताई केसकर उपस्थित होते. मुख्याध्यापिका सौ . अस्मिता शूळ यांनी वर्षभरातील कार्यक्रम अहवालरुपाने पडद्यावर सादर केले .

सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी संत परंपरेवर आधारीत पंढरीची वारी, अभंग, गवळण, भारुड़ नाटिका, नृत्य सादर केली. सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थिती असलेल्या सर्वांची दाद मिळाली. चित्रपटातील अर्थहीन गाण्यांवर नाचण्यापेक्षा अशा प्रकारच्या सादरीकरणातून मुलांवर चांगले संस्कार होतात असा सूर पालक वर्गातून उमटला.

स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने पारितोषिक वितरण, रांगोळी प्रदर्शन, हस्तकला प्रदर्शन तसेच हस्तलिखित प्रकाशन असा सोहळा शाळेत संपन्न झाला. यावेळी भिंगार हायस्कूलच्या माजी पर्यवेक्षक सौ. गीतांजली भावे, शिशुविहार बालवाडीच्या सौ. सुनिता देव, परिवर्तन प्रतिष्ठानचे डॉ. श्री. अरुण कुलकर्णी, श्री. विकास कावरे या मान्यवरांची उपस्थिती होती.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे