जिल्हा परिषद निवडणूकांमध्ये तरूणांना संधी..राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतील निर्णय – खा. नीलेश लंके यांची माहिती
अहिल्यानगर

खा, लंके यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत्या पंधरा दिवसांत प्रदेशाध्यक्ष पदापासून मोठे संघटनात्मक बदल होतील अशी चर्चा असल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले असता पक्ष संघटनेच्या विषयावर या बैठकीत चर्चा झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची विचार विनिमय बैठक गेल्या दोन दिवसांपासून शरद पवार, प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडत आहे.
प्रत्येक सेल प्रमाणे स्वतंत्र बैठक घेण्यात येत आहे.प्रत्येक बैठकीत उपस्थितांची मते जाणून घेण्यात येत आहेत. या बैठकांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली असून येणाऱ्या कालखंडात पक्षाला कसे पुढे घेऊन जायचे, पक्षाची ध्येय धोरणे घराघरापर्यंत कसे पोहचवायचे यावर विचार मंथन झाले.सध्याच्या स्थितीमध्ये आपण शेतकरी बांधवांना कसा न्याय देऊ शकतो, सरकारला कसे प्रत्युत्तर देऊ शकतो यावर बुधवारी विचारमंथन झाल्याचे खासदार लंके यांनी सांगितले.
युवक आणि ज्येष्ठांचा मेळ घालयचांय
बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका या निवडणूकीत युवकांना संधी देण्याबाबत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुचना दिल्या.त्याप्रमाणे निर्णय घेण्यात आला.युवक व ज्येष्ठ यांचा मेळ घालून पक्षाचा चेहरा जनतेपुढे न्यायचा आहे.- खासदार नीलेश लंके,लोकसभा सदस्य.
विधानसभा निवडणूकीतील पराभवावर चिंतन
लोकसभा निवडणूकीत चांगले यश प्राप्त झालेले असताना विधानसभा निवडणूकीत कोणत्या कारणामुळे पराभवाला सामोरे जावे लागले या विषयावर बुधवारच्या बैठकीत सखोल चर्चा करण्यात येऊन चिंतन करण्यात आले.पुढील निवडणूका संदर्भातही मते जाणून घेण्यात आल्याचे खासदार नीलेश लंके म्हणाले.