
आकाशवाणी अहमदनगर केंद्रात समनुदेशिती-प्रसारण, समनुदेशिती-किसानवाणी आणि समनुदेशिती युववाणी अर्थात नैमित्तिक उद्घोषक/उद्घोषकांच्या पॅनलमध्ये समावेश करण्यासाठी स्वरचाचणीसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. या संदर्भात अटी या प्रमाणे आहेत.
१. उमेदवार हा अहिल्यानगर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रहिवासी असावा.
२. वयोमर्यादा – उमेदवाराचं वय दि.१० डिसेंबर २०२४ रोजी, समनुदेशिती-युववाणी पदासाठी १८ ते ३० वर्ष ,तसेचं समनुदेशिती-किसानवाणी आणि समनुदेशिती-प्रसारण पदासाठी २० ते ५० वर्षाच्या दरम्यान असावे
३. शैक्षणिक पात्रता –
अ) समनुदेशिती-प्रसारण पदासाठी उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे.
ब) समनुदेशिती-किसानवाणी पदासाठी उमेदवार हा कृषि पदविधर किंवा कृषि पदविकाधारक असावा.
क) समनुदेशिती- युववाणी पदासाठी किमान १२ वी परिक्षा उत्तीर्ण अथवा कुठल्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे.
४. उमेदवाराचे उच्चार सुस्पष्ट हवेत, आवाज प्रसारण योग्य हवा.
५. उमदेवाराला लेखी परीक्षा, स्वरचाचणी आणि मुलाखतीनंतर पात्र उमेदवारांना आवश्यकतेनुसार नैमित्तिक करारावर बोलावण्यात येईल. ही कुठल्याही स्थायी स्वरुपाची सरकारी अथवा निमसरकारी नोकरी किंवा नोकरीची हमी नाही याची नोंद घ्यावी.
६. उमेदवारांना मराठी ,हिंदी ,इंग्रजी भाषेचं ज्ञान आणि संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे.
७. यशस्वी उमद्वाराला तिन्ही प्रसारण सभेत उद्घोषणांसाठी किंवा किसानवाणी /युववाणी कार्यक्रम निर्मीतीसाठी करार तत्वावर अनुबंधानुसार येणे आवश्यक राहील. पहाटे ५.१५ ते दुपारी १२.३५, सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.२० आणि संध्याकाळी ४ ते रात्री ११.२० या प्रसारण सभांच्या वेळा असतील.
८. अर्ज प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी आकाशवाणी अहमदनगर केंद्रात कार्यालयीन वेळेत सकाळी ११.०० ते ६.०० या वेळेत संपर्क साधावा.
९. परीक्षा शुल्क – अर्ज करतांना युववाणीसाठी रु. ११८ /- तसेच किसानवाणी आणि उद्घोषक / उद्घोषिका प्रसारणासाठी रु ३५४/- एन ई एफ टी अथवा Online Banking/RTGS च्या स्वरुपात शुल्क देणे आवश्यक आहे. अर्जासोबत बँक व्यवहाराची पावती UTR नंबर सहीत जोडावी.
१०. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख मंगळवार दिनांक १० डिसेंबर २०२४ रोजी ,सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत राहील.त्यानंतर येणारे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत याची नोंद घ्यावी
११. लेखी परिक्षा , स्वर चाचणी परीक्षेची तारीख,वेळ आणि ठिकाण पात्र उमेदवारानां कळवण्यात येईल.