ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

दिलखुलास गप्पामहाराष्ट्र

शहाणपण.. या विषयावर हिरकणी सौ.अनिता गुजर राहणार डोंबिवली यांनी खुपच सुंदर असा लेख लिहिलाय..नक्कीच वाचा..

डोंबिवली..

आजकाल कोणाचा कोणावर विश्वासच राहिला नाही. प्रत्येक जण एकमेकांकडे संशयाने बघत आहे. मला एक कळत नाही कि माणूसच माणसाच्या विश्वासावर विश्वास का ठेवत नाहीये? कुठेतरी त्यांच्यामध्ये स्वार्थ दडलेला असतो का ?बरं स्वार्थ साधून घेतला तरी त्याचं मन मात्र त्यांना खात रहाते, उदास राहते… काही प्रश्नांना उत्तरे सापडत नाही हेच खरे आहे …

आणि जरी उत्तर सापडली तरी ती काही कारणास्तव देता येत नाही .कारण चारी बाजूंनी आपल्या मनाची कोंडी होते. अशा वेळी मनात घुसमट होते. स्वतःच्या मौजेसाठी किंवा स्वार्थासाठी जीवन असते, की निःस्वार्थी जगण्यामध्ये जीवनाची मौज असते हे प्रत्येकाला कळले पाहिजे.कारण स्वार्थासाठी मिळवलेला आंनद फार काळ टिकत नाही, पण निःस्वार्थी पणे कार्य करून मिळवलेला आंनद चिरकाल टिकतो, मनाला समाधान देतो.

काही जणांना शेवटी आपलेच म्हणणे खरे करण्याची सवय असते , दुसऱ्यांच्या मनाचा विचार न करणे अशी त्यांच्या मनाची विचारांची वृत्ती असते . इतरांच्या अंतःकरणाला दगड मानणे ही आपल्या मनाची मृदुलाता असते का?…अजिबात नाही..कधी कधी आपल्या व्यक्तीला समजून घेण्यातच लोकांचा गैरसमज होत असतो पण पण अशा गैरसमजुतीमुळे माणसे स्वतः जळतात आणि दुसऱ्यालाही जाळतात हे ही तितकेच खरे…प्रत्येक मनुष्याला कधी ना कधी या गोष्टींचा उलगडा होतो.

जीवनात थोडा शहाणपणा येतो पण हा शहाणपणा , समजूतदारपणा दुसऱ्याला लागलेल्या ठेचांनी नाही तर स्वतःला लागलेल्या ठेचांनी, मनावरील जखमांनी होतो.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे