पद्मशाली वधू-वर सूचक संस्था, पुणे पंचकमिटी पुणे शहर(अंतर्गत)आयोजित उप वधू-वर मेळावा उत्साहात संपन्न
पुणे

रविवार दिनांक 19 मे 2024 रोजी सकाळी १०.३०.वाजता मार्कंडेय महामुनीच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते होऊन पद्मशाली उप वधू वर मेळाव्याचे उदघाटन झाले.
या प्रसंगी पेशवाई क्रिएशनचे संचालक मा. श्री. राहुल शेठ येमूल, मा. श्री. व सौ. सागर शेठ पासकंठी (कलाक्षेत्रम), मा. श्री. रमेशशेठ मिठापेल्ली, मा. श्री. विक्रमसेठ विलाससागर, मा. श्री. प्रशांत दासरी, मा. श्री. वसंतराव येमुल (सरपंच पद्मशाली पंच कमिटी) मा. श्री. अशोक झंपाल (विश्वस्त), मा. श्री. ज्ञानेश्वर बोड्डू (अध्यक्ष), मा. श्री. मनीष अंदे (सचिव), मा. श्री.राजेंद्र आडेप, मा. श्री. विलास मदेल, मा. श्री. वेंकटेश चाटला (प्रमुख समुपदेशक), मा. श्री. चंद्रकांत गड्डम (निवृत्त न्यायाधीश), मा. श्री. सोमनाथ शेठ कैंची , मा. श्री. मुकुंदराज सिंगारम, मा. श्री. शंकरराव मुत्याल (अध्यक्ष), मा. श्री. नरसय्या गंधाल, (उपाध्यक्ष), मा. श्री. चंद्रकांत कटकम (सचिव), मा. श्री. महेशशेठ कोठे माजी महापौर सोलापूर महानगरपालिका व पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघम अध्यक्ष, मा. श्री. महेश चलमल (उपाध्यक्ष), मा. श्री. सुरेश अनमल (विश्वस्त मार्कंडेय शिवालय, वडगावशेरी पुणे) मा. श्री. नारायण बोरा संस्थापक लक्ष्मी महिला पतसंस्था नगर, मा. श्री. ऋषिकेश गुंडला समाजसेवक, नगर, मा. श्री. जितेन्द्र कांचानी, अध्यक्ष विशेष मागास प्रवर्ग अन्याय निवारण कृती समिती असे सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कुठल्याही शुभकार्याची सुरुवात विघ्नहर्ता गणेशाला नमन करून होते.
यावेळी भारतीय शास्त्रीय नृत्य भरतनाट्यम मधील “गणेश वंदना” कुमारी वैष्णवी रामदिन, कु. अनिशा येमुल, मिताली दासरी, वाणी, अवंती पंदीर्ला, वर्मिका अंदे, यांनी सादर करून उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
यानंतर उपस्थित मान्यवरांच्या सत्काराची उदघोषणा मा. श्री. दीपक रामदिन (सेवानिवृत्त, मुख्याध्यापक, मार्कंडेय विद्यालय अहमदनगर) यांनी केली. नंतर अध्यक्षांनी आपल्या प्रास्ताविकातून गेली तीन दशके अखंडपणे सुरू असलेल्या या उपवधू -वर मेळाव्याची पार्श्वभूमी सांगितली. संस्थेतील सर्व पदाधिकारी व सदस्य, निस्वार्थपणे सामाजिक ऋण या भावनेतून सर्वस्व पणाला लावून हा “जगन्नाथाचा रथ” यशस्वीपणे ओढतआहेत. याप्रसंगी महाराष्ट्रातून मराठवाडा, विदर्भ, सोलापूर, नगर, मुंबई, कल्याण नाशिक, सिन्नर, भिवंडी, संगमनेर तसेच गुजरात, तेलंगणा, छत्तीसगड राज्यातील समाज बांधवांनी उपस्थित राहून उपकृत केले.
सत्काराला उत्तर देताना सोलापूर आदरणीय, महेश विष्णुपंत कोठे यांनी गेली तीन दशके हा वधू वर मेळावा सातत्याने होत आहे, या स्तुत्य उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. मा. श्री. मनीष अंदे यांनी आपल्या मनोगतातून वधू-वरांनी जास्त अपेक्षा न ठेवता विवाहास प्राधान्य द्यावे असे सांगितले.
मा. श्री.नागेश म्याना पंतुलू यांनी आपल्या मनोगतातून उपवर वधू-वरांच्या विवाह जुळण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना सांगितल्या. या उतार वयात देखील या संस्थेचे सर्व कार्यकर्ते निस्वार्थीपणे सेवा देतात दर रविवारी 11 ते 2 या वेळेत कार्यालयात आलेल्या समाज बांधवांना संपूर्ण माहिती देतात.
मा. सौ. नंदाताई गरदास यांनी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी व सौ. नीताताई वंगारी यांनी यावर्षी विवाह इच्छुक उमेदवारांना बोलते करून मुलाखत वजा परिचय अत्यंत सुरेख सादर केला.
दुपारच्या भोजनानंतर संध्याकाळी साडेचार ते सहा या वेळेत झालेल्या उपवर वधू वर पुनर्विवाह मेळाव्याचे संचालन करताना ज्येष्ठ सदस्य मा. श्री. प्रमोद पुट्टा (ॲडवोकेट व नोटरी) उपवर वधू-वरांनी पुनर्विवाहकरीता जास्त अपेक्षा न ठेवता विवाहास प्राधान्य द्यावे.
कार्यक्रमाचा समारोप करताना संस्थेचे सचिव मा. श्री. चंद्रकांत कटकम यांनी आभार प्रदर्शनात समाजाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल समाज बांधवांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम एका विशिष्ट उंचीवर नेण्याकरिता आपल्याओघवत्या भाषेमध्ये सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडताना सौ. नंदाताई गरदास व सौ. नीताताई वंगारी यांचे विशेष आभार मानले. सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचे भोजन व चहापान याचे प्रायोजकत्व स्वीकारून बहुमोल आर्थिक मदत करणारे पेशवाईचे संचालक मा. श्री. राहुल शेठ येमूल, मा. श्री. सागर शेठ पासकंठी, मा. श्री. रमेशजी मिठापेल्ली, मा. श्री. विक्रम विलासागर, मा. श्री. प्रशांत दासरी व इतर आलेल्या मान्यवरांचे विशेष धन्यवाद देत त्यांचेही आभार व्यक्त केले.
कार्यक्रम ठिकाणी अत्यंत सुरेख अशा रांगोळ्या काढून सुशोभीकरण करणारे श्री. रघुराज देशपांडे यांचे मनस्वी आभार मानले. लक्ष्मी बाजार समितीचा भव्य हॉल उपलब्ध करून देणाऱ्या संस्थेचे, सर्व संचालकांचे मनस्वी आभार.
अत्यंत सुरेख साऊंड व्यवस्था भव्य स्क्रीन डिस्प्ले ऑपरेट करणारे श्री. अमित दुडम, मंडप व्यवस्था सजावट करणारे अभिजीत अनमल, फोटोग्राफर श्री.केतन रेगुंठा, मा. श्री. पिंपळे त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी भोजन व्यवस्था उत्कृष्ट केल्याबद्दल भोजनानंतरसर्व समाज बांधवांनी समाधान व्यक्त केले.
हा ३१ वा वधू वर मेळावा अत्यंत यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी भरीव योगदान देणारे संस्थेतील मा. श्री. शंकरराव मुत्याल, अध्यक्ष, मा. श्री. नरसय्या गंधाल (उपाध्यक्ष) मा. श्री. चंद्रकांत कटकम (सचिव), मा. सौ. नंदाताई गरदास (खजिनदार), मा. सौ. चंद्रकला पुट्टा (कार्याध्यक्ष), मा. श्री. अनिल सग्गम, मा. श्री. व सौ. विलास जिंदम (माजी अध्यक्ष), मा. श्री. प्रमोद पुट्टा, (ॲडवोकेट व नोटरी माजी उपाध्यक्ष), मा. श्री. प्रभाकर जिंदम, मा. श्री. प्रभाकर रेगुंठा, मा. श्री. अंबादास सामलेटी, मा. श्री. जनार्दन दासरी, मा. श्री. व सौ. कृष्णहारी सन्नापुरी, मा. श्री. शंकरराव उरडी, मा. श्री. लक्ष्मण दंडी, श्री व सौ सत्यनारायण कुंदारम, श्री. साईनाथ सापा, श्री. विजय सापा, श्री. सतीश आंबेटी, श्री व सौ रामदिन, श्री. व सौ. अभिषेक कानपिलेवार श्री व सौ. बासा, सौ. कांता कुंदेन, सौ. अनुराधा भंडारी, सौ. प्रतिभा जाना, सौ. अर्चना येमुल, सौ. सुवर्णा नागुल कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व ज्ञात अज्ञात यांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाच्या शेवटी मा. श्री. सदाशिव मेरगु यांनी सामूहिक पसायदान सादर करून कार्यक्रमाची सांगता केली.