ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

नगर शहराचा 534 वा वर्धापन दिन व नगर जल्लोष 2024 मोठा उत्साहात संपन्न

अहमदनगर - शहर प्रतिनिधी सागर सब्बन

अहमदनगर शहरात 534 व्या वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरा करण्यात आला आहे .

नगर जल्लोष 2024 दिनांक 28 मे रोज 2024 रोजी नगर शहरातील जॉगिंग पार्क प्रोफेसर कॉलनी (सावेडी) येथील ग्राउंड वर सादर करण्यात आले.

नगरचा वारसा जपणारा नगर शहरातील सुप्रसिद्ध शिंगवी ज्वेलर्स प्रस्तुत दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहात मराठी हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

नगर जल्लोष अध्यक्ष सागर बोगा ,व त्यांची सर्व टिम सर्व मिञ परिवार दर वर्षी चांगलीच परीश्रम घेत असतात. नगर जल्लोष 2024 जॉगिंग पार्क येथील मैदानावर गाणी व मनोरंजन मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सायं 6 वाजता गणांत ढोल वादय पथक सादर करण्यात आला . व सायंकाळी 7  वाजता ओपोट्रॉफी डान्स अकॅडमी तर्फे श्री गणेशा या आकर्षक गाण्यांचा पासून सुरुवात करण्यात आली.

व कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले व या कार्यक्रमात सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड , सौरभ भोसले ,(स्टोरी टेलर) श्वेता दांडेकर (मराठी इंडियन आयडॉल फेम उपविजेते )जगदीश चव्हाण (मराठी इंडियन आयडॉल उपयोजिता) गौरी पगारे ,(सा रे ग म प लिटल चॅम्प विजेती )जयेश खैरे ( सा रे ग म प लिटल चॅम्प विजेता) भाग्यश्री टिकले ( मराठी इंडियन आयडॉल ) चैतन्य देवडे (माऊली) मराठी इंडियन आयडॉल ,अनिता दाते (अभिनेत्री इंद्राणी फ्रेम आनंदाबाई ) स्वानंद बर्वे ( इंद्रायनी फ्रेम रिंकू महाराज ) इंद्रनील कामत (अभिनेता) रसिका वखालकर (अभिनेत्री) या सर्व गायकांचा उपस्थितीत जॉगिंग पार्क दंग होऊन गेले.

व लहान मुलांच्या डान्स अकॅडमी खूप आकर्षक ठरल्या व विविध अकॅडमीनी सर्वांनी सहभाग घेतला लहान मुलांच्या विविध डान्स ग्रुप व प्रमुख सर्व गायकांच्या मधुरा आवाजांनी मैदान माञ मंग्न होऊन गेले होते .

या कार्यक्रमात आपल्या नगर शहरातील मा, आमदार संग्राम भैय्या जगताप , महानगरपालिका आयुक्त , दळवी साहेब , यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आले होते , नगर भूषण गाजवणारे पद्मश्री ऑव्हार्ड ,पोपटराव साहेब ,व दुसरा अव्हार्ड प्रसिद्ध उद्योजक , जोशी साहेब , व तिसरा अव्हार्ल्ड रेणुकाताई यां सर्वांचे नगर जल्लोष तर्फे पारितोषिक सत्कार व सन्मान करण्यात आला होता .

व रात्री प्रशासनाच्या नियमांचे पालन करण्यात आले . रात्री 10 वाजता कार्यक्रमात संपन्न करण्यात आला करण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे