ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

दिलखुलास गप्पामहाराष्ट्र

वृद्धाश्रम असावे की नसावे…या मुद्द्यावर एक सुंदर असा लेख..

हिरकणी सौ.अनिता गुजर. राहणार डोंबिवली यांनी लिहिला आहे...

वृद्धाश्रम असावे की नसावे…आजकाल बघायला गेले तरसगळ्यात महत्वाचे म्हणजे काय तर… वेळ हीच एक महत्वाची गोष्ट आहे जी आजकालच्या धकाधकीच्या जीवनात कोणाकडे नाही ,आणि जरी असला तरी तो त्यांच्या फायद्याच्या कामपूरता मर्यादित .

पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती ,घरातील स्त्रिया सहसा नोकरी करत नसल्यामुळे घरीच असायच्या .पण आता परिस्थिती बदलली.स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आपले घर चालवते. घर आणि ऑफिस या चक्रात अडकून जातात. त्यामुळे जर घरात कोणी वृद्ध व्यक्ती असली तर त्यांच्याकडे लक्ष कोण देणार हा मोठा प्रश्न? मुलांनाही बाहेर पाळणा घरात ठेवतात.शाळेसाठी बस किंवा एखादी व्यक्ती ठेवतात.सकाळ संध्याकाळ स्वयंपाकासाठी बाई ठेवतात नाहीतर बाहेरून पार्सल घेऊन येतात. किती सोपं आयुष्य ना कसलीच जबाबदारी नाही सर्व पैशाच्या जोरावर चालते.अशा वेळी वृद्ध आई वडिलांकडे लक्ष देत नाही, त्यामुळे मुलांनाही आजी आजोबांचे प्रेम मिळत नाही.आई आजारी असली तरी तिला दवाखान्यात कोण नेणार यावर वाद चालतो घरात.

ज्या आई वडिलांनी खस्ता खाऊन एवढ्या मोठ्या पदावर आणलं याची जाणच रहात नाही. अशा वेळी त्यांना वृद्धाश्रमात ठेवले जाते. किती चुकीचे आहे .पण जर कोणी लक्ष देणारे,मायेने विचारपूस करणारे कोणी नसेल तर वृद्धाश्रम असलेलेच बरे.तिथे समवयस्क लोकांशी बोलून मन हलके होते .

पण खरंच मनापासून वाटते की नको हे वृद्धाश्रम ,ज्यांनी आपल्याला हे जग दाखवले त्यांच्यासाठी त्यांच्या उतारवयात आपणच आधार दिला पाहिजे. मी तर म्हणेन सरकारने या गोष्टीसाठी सक्तीचा कायदा काढावा म्हणजे कळेल मग मुलांना. ते हा विचार का करत नाही की उद्या आपण म्हातारे झालो आणि आपल्या मुलांनी आपल्याला वृद्धाश्रमात ठेवले तर काय होईल. अहो शेवटी मूल अनुकरण करतात.

अटळ आहे अटळच राहीलवि..धिलिखित टळणे

उगवत्याच्या नशिबी जैसे..नित्य मावळणे

आपला पण मावळतीचा काळ येणार हे लक्षात ठेवा. म्हणूनच वृद्धाश्रम नसावे असे वाटते.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे