ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

मनोज जरांगेंचे बरे वाईट झाल्यास भाजप औषधालाही शिल्लक ठेवणार नाही

अहमदनगर

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सध्या आंदोलन सुरू आहे. मात्र, राज्य सरकार जरांगे यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. जरांगे यांच्या प्रकृतीला जर काही बरे वाईट झाले तर राज्यात भाजप औषधालाही शिल्लक ठेवणार नसल्याचा इशारा मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष महादेव साळुंखे यांनी दिला. त्याच बरोबर सरकारने तातडीने हालचाली करून मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

महादेव साळुंखे म्हणाले की, मराठा समाजाला न्याय मिळावा, यासाठी अनेक नेत्यांनी आत्मबलिदान दिले आहे. राज्यामध्ये सध्या सहा कोटी मराठा समाज आहे. मराठ्यांनी स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान दिले आहे.

आज मराठा समाजाची परिस्थिती ही बारा बलुतेदारांसारखी झाली आहे. मराठा समाज दारिद्र्यरेषेखाली गेला आहे. मराठा समाजाची आर्थिक सामाजिक परिस्थिती ही हलाखीची झाली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी गेल्या दहा वर्षांपासून आंदोलनाची तीव्रता वाढलेली आहे. मात्र, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी चुकीची माणसे खोडा घालत आहे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे