ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

मराठ्यांनी पंतप्रधानांचं विमानही शिर्डीला उतरू दिलं नसतं.

शिर्डी

“मराठा समाजाला अपेक्षा होती. परवा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले होते. पंतप्रधानांना आरक्षणाबाबत काही सांगितलं असेल असं वाटलं होतं. पण त्यांनी महाराष्ट्रातील आरक्षणाचा लढा पंतप्रधानांना सांगितलेला नाही अशी शंका आहे.

जर पंतप्रधानांना त्यांनी मराठा आरक्षण आणि आंदोलनाबाबत सांगितलं असेल, तर पंतप्रधान जाणूनबुजून आरक्षणावर बोलले नाहीत असं समजायचं का? याची शंका आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “इतक्या जवळ येऊन पंतप्रधान देशव्यापी आंदोलनाची दखल घेत नाहीत, याचा अर्थ त्यांना सांगितलेलं नाही किंवा त्यांनी तो विषय घेतला नाही.

त्यांनी विषय घेतला काय आणि नाही घेतला काय? मराठ्यांना फरक पडत नाही. पण समाज यासाठी शांत होता की पंतप्रधान हा विषय हाताळतील आणि राज्य सरकारला या विषयावर मार्ग काढायला सांगितला.

मराठ्यांच्या मनात पंतप्रधानांच्या मनात पाप नव्हतं. वाईट नव्हतं. जर मराठ्यांच्या मनात त्यांच्या विषयी वाईट भावना असतील तर मराठ्यांनी त्यांचं विमानही शिर्डीला उतरू दिलं नसतं” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे