ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

मराठा आरक्षण लांबणीवर

मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे समितीला सरकारकडून 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याआधी शिंदे समितीला अहवाल देण्यासाठी 30 नोव्हेंबरची मुदत देण्यात आली होती.

मात्र तेलंगणामध्ये सध्या विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे तेलंगणामधून मूळ कागदपत्र मिळण्यास विलंब होत आहे. त्याचमुळे सरकारकडून शिंदे समितीला ही मुदतवाढ देण्यात आली आहे. मराठा समाज आणि कुणबी दाखले यासाठी ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

या कागदपत्रांसाठी विलंब होतोय. त्यामुळे मराठा आरक्षण लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा हा आधी निजामशाही राजवटीचा भाग होता. त्यामुळे निजाम स्टेटचे सगळे मूळ डॉक्युमेंट्स हे तेलंगणातील हैदराबाद या ठिकाणी आहेत.

या कागदपत्रांच्या आधारे शिंदे समिती आपला अहवाल सादर करणार आहे. महाराष्ट्राकडून निजामकालीन कागदपत्रांसाठी तेलंगणा सरकारसोबत पत्रव्यहार केला जात आहे.

महाराष्ट्र राज्याच्या सचिवांनीसुद्धा तेलंगणा राज्याच्या सचिवांना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून निजामकालीन कागदपत्र उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. मात्र निवडणुकीच्या कामकाजामुळे ही कागदपत्र मिळण्यास विलंब होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे