ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

सामाजिक

कुंकू ते कलश, नवरात्रीच्या काळात घरात या गोष्टी ठेवणं मानलं जातं शुभ

शारदीय नवरात्रीला आता फक्त काहीच दिवस उरले आहेत. नवरात्रोत्सवाचा उत्साह आधीच सुरू झाला आहे. सध्या, आपण पितृ पक्षातून जात आहोत जे १४ ऑक्टोबरपर्यंत चालू राहील. त्यानंतर पुढील दिवसापासून नवरात्रीला सुरुवात होईल. यावेळी देवीचं आगमन हत्तीवर बसून होत आहे, जे आपल्या सर्वांसाठी शुभ असेल.

नवरात्रीमध्ये घटस्थापनेच्या आधी किंवा पहिल्या दिवशी काही वस्तू घरी आणून तुम्ही या वर्षीची शारदीय नवरात्री आणखी शुभ बनवू शकता. कोणत्या आहेत या शुभ गोष्टी..

तुमच्या घरी पूजा करण्यासाठी तुम्ही स्वतःची देवीची मूर्ती खरेदी करू शकता. नवरात्रीचे ९ दिवस मूर्तीला सजवा आणि पूजा करा. देवीच्या कृपेने तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी व्हाल. नवरात्रीनंतरही तुम्ही ही मूर्ती पूजेसाठी वापरू शकता.

देवीची पावले

ज्या घरामध्ये देवीची पावले असतील, त्या घराला आशीर्वाद मिळेल आणि घरातल्यांचं नशीबही उजळेल असं मानलं जातं. त्यामुळे यंदाच्या नवरात्रीमध्ये देवीमातेची पावले घरात लावा. पण ही पावलं घराच्या दरवाज्याजवळ जमिनीवर ठेवू नका. चुकून तुमचा किंवा इतर कोणाचा, पाहुण्यांचा पाय त्यावर पडू शकतो. त्यामुळे ही पावले शक्यतो देवघरात ठेवावीत.

भगवतीचे बिसा यंत्र

धन आणि संपत्तीच्या वाढीसाठी नवरात्रीमध्ये देवी भगवतीचे बिसा यंत्र घरी आणणं शुभ मानलं जातं. त्यात देवी काली, देवी सरस्वती आणि देवी महालक्ष्मी वास करतात. हे यंत्र तुमचे भाग्य बदलेल अशीही समजूत प्रचलित आहे.

कलश किंवा घट

नवरात्रीची सुरुवात कलशाच्या स्थापनेने होते. ते शुभ प्रतीक आहे. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार माती, पितळ, चांदी किंवा सोन्याचा कलश आणू शकता.महाराष्ट्रात धान्य पेरून त्यामध्ये घट स्थापन करण्याची पद्धत प्रचलित आहे.

त्रिशूळ

त्रिशूळ हे देवीचं शस्त्र आहे. हे भगवान शिवाचं शस्त्रदेखील आहे. नवरात्रीमध्ये तुम्ही एखादं छोटंसं त्रिशूळ खरेदी करून देवघरात ठेवू शकता आणि याची नियमित पूजाही करू शकता. हे देवीमातेच्या शक्तीचं प्रतिनिधीत्व करते.

कुंकू

कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे आणि देवी पार्वती सौभाग्यासाठी कुंकू लावते. या नवरात्रीत तुम्ही तुमच्या घरासाठी, विशेषतः विवाहित महिलांसाठी कुंकू खरेदी करू शकता.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे