ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

अदृश्य शक्तीने महाराष्ट्रात फिरावे – सुप्रिया सुळें

अहमदनगर

देशात एएस म्हणजे अदृश्य शक्ती कार्यरत आहे, असे खा. सुप्रिया सुळे  म्हणताच महाविकास आघाडी पदाधिकार्‍यांनी अमित शहांच्या नावाचा गलका केला…त्यावर, मी कोणाचे नाव घेत नाही, पण तुम्ही म्हणताय असे स्पष्ट करीत, या अदृश्य शक्तीने एकट्याने महाराष्ट्रात फिरावे, म्हणजे त्यांना खरा महाराष्ट्र समजेल व लोकांच्या भावनाही कळतील, असे आव्हान खा. सुळे यांनी सोमवारी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांचे थेट नाव न घेता दिले.

पाथर्डीच्या  दौर्‍यानिमित्त खा. सुळे नगरला आल्या होत्या. येथील शासकीय विश्रामगृहावर त्यांनी नगर शहर व तालुक्यातील महाविकास आघाडी पदाधिकार्‍यांची बैठक घेतली.

यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, माजी मंत्री आ. प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायक देशमुख, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्यासह अन्य उपस्थित होते.

यावेळी खा. सुळे यांनी जिल्ह्यातील सद्य राजकीय स्थितीचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले. महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांनी स्थानिक स्तरावरही एकत्रित राहावे, आपल्याला वातावरण अनुकूल आहे.

जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन व विधानसभेच्या सर्व 12 जागा आपल्याला जिंकायच्या आहेत, असे स्पष्ट करून त्या म्हणाल्या, तीनही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत लवकरच नगरला मेळावा घेतला जाणार आहे.

यासाठी अनिल देसाई, संजय राऊत, बाळासाहेब थोरात यांच्याशी मी बोलणार आहे, असे त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे