
१९ कोटी रुपयांचा जीएसटीथकवल्याप्रकरणी भाजपच्या राष्ट्रीयसचिव पंकजा मुंडे यांच्या परळीतालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथसहकारी साखर कारखान्यावरकारवाई केल्यानंतर पंकजा यांच्यामदतीला मुंडे समर्थक धावून आलेआहेत. त्यांनी सोशल मिडिआवरलाखो रुपये मदतीच्या घोषणाकेल्या असल्या तरी अद्यापपंकजांच्या खात्यात एक रुपयाहीजमा झालेला नाही.
दरम्यान, पंकजायांनी सोशल मीडिआतूनसमर्थकांशी संवाद साधला. त्यातत्यांनी म्हटले आहे की, मलाकोणीही आर्थिक मदत करू नये.मात्र, सद्भावना आणिआशिर्वादाचे बळ कायम माझ्यापाठिशी उभे करा.
मुंडे समर्थकांनी सांगितले की, दोनदिवसांत बीडजिल्ह्यात सातकोटी रुपयेगोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या नावानेसंकलित झाले आहेत. २८ऑक्टोबर राेजी सावरगाव येथेदसरा मेळावा होत असून यामेळाव्यात पंकजा यांच्याकडे १९कोटींपेक्षा जास्त रकमेचे धनादेशसुपूर्द करणार आहाेत.
१९ कोटींपेक्षा अधिकरक्कम जमा होईल
वैद्यनाथ सहकारी साखरकारखान्यास मदतीसाठी जिल्ह्यातुनउस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. लोकनेतेगोपीनाथ मुंडे यांनी उभा केलेल्यावैद्यनाथ कारखान्याला पूर्व वैभवमिळवुन देण्यासाठी मुंडे समर्थकसरावले आहेत. दसरा मेळाव्यात हेसर्व धनादेश एकत्रित करून पंकजामुंडेंना दिले जाणार आहेत. १९कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा होईल.आर्थिक परिस्थिती नसताना सामान्यशेतकऱ्यांसह अनेक लोक मदत करतआहेत. – राजेंद्र मस्के, जिल्हाध्यक्ष,भाजप
सोशल मीडियावर जाहीर रकमा
शालीनीताई कराड ५० लाख, भाजप जिल्हाध्यक्षराजेंद्र मस्के- ११ लाख, विजय गोल्हार- ११ लाख,सलीम जहांगीर -(कोरा चेक), संतोष हांगे- (कोराचेक), सर्जेराव तांदळे (वडिलोपार्जित जमीन),भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी- १ लाख, संतोष राख -५ लाख, अमोल जायभाये- २ लाख, विवेक पाखरे -१ लाख, संग्राम बांगर- ५१ हजार, बाळासाहेब चोले-११ हजार, महारुद्र खेडकर – २१ हजार, सोमनाथकऱ्हाडे – २१ हजार, भगवान गदळे – ५ लाख, अरुणमुंडे – ५ लाख, राम प्रभू मुंडे २५ हजार, अर्जुन तिडके५१ हजार, धनराज मुंडे – ५१ हजार, बालाजी फड-३१ हजार, गणेश बडे – २१ हजार, तेजस तिडके -२१हजार, ज्ञानेश्वर मुंडे – ५ हजार, दीपक मुंडे – १लाख, धनंजय घोळवे – ११ हजार, दादाहरी बटुळे-७,७७७, गणेश बहिरवाळ- १११११, हरीभाऊ तांदळे -५१ हजार, संदीपान ठोंबरे – ५ लाख.