ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर

पुणे

अंतिम अथवा प्रारूप मतदारयाद्या सात जूनपर्यंत प्रसिद्ध केलेल्या २७ हजार ६४ सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत.

येत्या नऊ ऑक्टोबरपासून निवडणुकांच्या प्रक्रिया सुरू करण्याचे आदेशही राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जारी केले आहेत.

या संदर्भात राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव वसंत पाटील यांनी माहिती दिली. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०मधील कलम ७३ व महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम २०१४ चे नियम ३ (पाच) तरतुदीन्वये प्राप्त अधिकारानुसार प्राधिकरण सरकारने पुढे ढकललेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश जारी केले आहेत.

ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांकरिता प्रारूप व अंतिम मतदारयाद्या सात जूनपर्यंत किंवा त्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आल्या अशा सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर पुढे ढकलण्यात आल्या आहेत, त्या टप्प्यापासून नऊ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीकरीता आठ जून ते २१ ऑगस्ट या दरम्यान प्रारूप अथवा अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, अशा सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी एक ऑक्टोबरपर्यंतच्या नव्याने प्रारूप मतदारयाद्या तयार करण्यात येणार आहेत.

ज्या प्रलंबित सहकारी संस्थांच्या निवडणुकांकरीता प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाहीत, अशा प्रलंबित संस्थांच्या प्रारूप मतदारयाद्या तयार करण्यासाठी आवश्यकतेनुसार प्रस्ताव प्राधिकरणाकडे पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

संघीय संस्थांच्या निवडणुकांकरीता सभासद संस्थांनी प्रतिनिधी नियुक्तीचे ठराव जिल्हा, तालुका, प्रभाग सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांना सादर केल्यास पुन्हा ठराव मागविण्याची आवश्यकता नाही. तथापि महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम २०१४चे नियम १०(४)मध्ये नमूद केलेल्या परिस्थितीत बदल करण्याची मुभा असलेले बदल जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांनी स्वीकारावेत. नवीन अर्हता दिनांकामुळे सभासद संस्था, नव्याने पात्र होत असल्यास अशा संस्थांकडून प्रतिनिधी नियुक्ती ठराव मागविण्याची प्रक्रिया जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांनी राबवावी, असेही राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव वसंत पाटील यांनी म्हटले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे