ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेच्या घरावर एमआयडीसी पोलिसांचा छापा

अहमदनगर

नवनागापुर येथील चेतना कॉलनीत हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालविणा-या महिलेच्या घरावर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकुन दोन पिडीत मुलींची सुटका केली आहे.

दि.०४ ऑक्टोबर रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग श्री.संपतराव भोसले यांना चेतना कॉलनी एमआयडीसी नवनागापुर ता. जि.अहमदनगर येथे राहत्या घरात एक महिला हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवून वेश्या व्यवसाय करून घेत आहे.त्याबाबत गोपनिय माहिती मिळाली.माहिती मिळतात श्री.भोसले यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि/राजेंद्र सानप यांना आदेश देवुन एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक तयार करून सदर ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून पंचासमक्ष छापा टाकण्यास सांगितले.

एमआयडीसी पथकाने सदरील ठिकाणी छापा टाकला असता दोन पिडीत मुलींची सुटक करण्यात आली आहे.व वेश्या व्यवसाय चालवणारी महिला आरोपी हिस ताब्यात घेवुन तिला सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे.या महिले विरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुरजिनंबर ९१९/२०२३ भादवि कलम ३७० सह अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा कलम ३,४,५,६,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हि श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक, श्री.संपतराव भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/राजेंद्र सानप प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन, पोहेकॉ/ नितीन उगलमुगले, पोना / विष्णु भागवत,पोना/राजु सुद्रीक,पोकॉ/किशोर जाधव, पोकॉ/उमेश शेरकर,पोकॉ/ नवनाथ दहिफळे,पोकॉ/सचिन हरदास,मपोना/ मनिषा काळे,मपोकॉ/सोनाली जाधव यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे