ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

आरबीआयकडून महाराष्ट्रातील ‘या’ दोन बड्या बँकांवर कठोर कारवाई

अहिल्यानगर

आरबीआय कडून पुन्हा एकदा महाराष्ट्रातील दोन बड्या बँकांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामुळे सदरील सहकारी बँकेच्या खातेधारकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून देशभरातील बँकांवर नियंत्रण ठेवले जात असते. देशातील सर्वच सरकारी, सहकारी आणि खाजगी बँकांना आरबीआयच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असते. बँकांसोबतच एनबीएफसी कंपन्यांना देखील आरबीआयच्या नियमांचे पालन करावे लागते.

ज्या बँका नियमांचे पालन करत नाहीत त्यांच्यावर आरबीआयकडून कठोर कारवाई देखील केली जाते. आरबीआय कडून काही बँकांवर नियमांच्या उल्लंघणामुळे दंडात्मक कारवाई केली जाते तर काही बँकांचे लायसन सुद्धा रद्द केले जाते.

आरबीआयला बँकेचा परवाना रद्द करण्याचा पूर्ण अधिकार आहे. अशातच आता आरबीआयने आपल्या महाराष्ट्रातील दोन बड्या बँकांवर मोठी कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार 17 जुलै 2025 रोजी आरबीआयने एक प्रसिद्धीपत्रक काढलं होतं ज्यात आपल्या राज्यातील दोन सहकारी बँकांना मोठा दंड लावला असल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रसिद्धीपत्रकानुसार महाराष्ट्रातील दोन आणि गुजरात राज्यातील दोन बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

राज्यातील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, ठाणे आणि द लक्ष्मी विष्णू सहकारी बँक लिमिटेड, इचलकरंजी या दोन बँकांना आर्थिक दंड ठोठावण्यात आला असल्याची माहिती आरबीआयच्या प्रसिद्धी पत्रकातून समोर आली आहे.

आरबीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, केवायसी संदर्भात आरबीआयने दिलेल्या निर्देशांची पूर्तता न केल्याने ठाणे जिल्ह्यातील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 2.10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय इचलकरंजी येथील द लक्ष्मी विष्णू सहकारी बँक लिमिटेडला 20,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

आरबीआयच्या लोन्स अँड अँडव्हान्सेस टू डायरेक्टर्स, देअर रिलेटिव्हस अँड फर्म्स, कन्सर्स इन विच दे आर इंटरेस्टेड यासंदर्भातील निर्देशांची पूर्तता न केल्यानं दंड आकारण्यात आला असल्याची माहिती आरबीआयच्या परिस्थिती पत्रकातून समोर आली आहे.

खरे तर या दोन्ही बँकांवर 14 जुलै रोजी कारवाई करण्यात आली होती. नंतर आरबीआयने या कारवाईची माहिती देण्यासाठी 17 जुलैला प्रसिद्ध पत्रक सुद्धा काढले होते.

आरबीआयकडून ठाणे आणि इचलकरंजी मधील या दोन सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि यामुळे सदरील बँकेच्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, जाणकारांनी आरबीआयच्या या कारवाईचा ग्राहकांवर कोणताच परिणाम होणार नसल्याचे सांगितले आहे.

दंडाची रक्कम फक्त बँकेकडून वसूल केली जाणार आहे, ग्राहकांकडून ही रक्कम वसूल होणार नाही. तसेच या कारवाईमुळे बँकेच्या आणि ग्राहकांच्या व्यवहारावर सुद्धा परिणाम होणार नाही. यामुळे सदरील बँकेच्या ठेवीदारांनी आणि ग्राहकांनी काळजी करू नये असे आवाहन जाणकारांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे