ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

बालक मंदिर महिला मंडळात गुरुपौर्णिमा उत्साहाने साजरी

अहिल्यानगर

भारतीय संस्कृतीतील गुरु शिष्य या उत्कृष्ट परंपरेचे महत्त्व आजच्या विद्यार्थ्यांमध्ये रुजण्यासाठी बालक मंदिर महिला मंडळ शाळेत बुधवार दिनांक 29 जुलै 2026 रोजी म्हणजेच आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच व्यासपौर्णिमा /गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

विद्यार्थिनींच्या गुरुवंदनेने कार्यक्रमाचा श्री गणेशा झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महिला मंडळाच्या अध्यक्षा मा . सौ ज्योती केसकर यांनी भूषवले.कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून नगरमधील उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शिका आणि धरोहर संस्थेच्या गिर्यारोहक सौ .करिष्मा जोशी यांना आमंत्रित केले होते .विद्यार्थ्यांच्या तोंडपाठ असलेल्या स्तोत्रपठण उपक्रमाचे कौतुक केले आणि उत्कृष्ट बोधप्रद संस्कारक्षम गोष्ट सांगून विद्यार्थी मनाचा ठाव घेतला.

याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अस्मिता शूळ यांनी आजच्या काळात सुसंस्कारांचे व मूल्यांचे महत्त्व किती आहे हे सांगून गुरुपौर्णिमेच्या उपक्रमाची माहिती दिली .बालवाडी व पहिलीतील विद्यार्थी स्वराज टकले व यांनी मनाचे श्लोक पाठ म्हटले . इयत्ता दुसरीतील युवराज मारवाडे याने हनुमान चालीसा तोंडपाठ म्हटले तर नचिकेत प्रजापती याने मारुती स्तोत्राचे पठण केले . इयत्ता तिसरी व चौथीतील सुमेध गांधी ,ऋत्विक शिंदे, राघव गायकवाड, आरुष सोनवणे या विद्यार्थ्यांनी गणपती अथर्वशीर्ष पठण केले. इयत्ता पाचवीतील हर्षदा मार्डीकर व अनन्या वाघमारे या विद्यार्थिनींनी श्रीरामरक्षा स्तोत्र पठण केले . इयत्ता सहावीतील भाग्यश्री सोनवणे व कीर्ती वड्डेपल्ली या विद्यार्थिनींनी गीतेतील बारावा अध्याय तोंडपाठ म्हटला. इयत्ता सातवीतील जोया सय्यद हिने गीतेचा पंधरावा अध्यायाचे पठण केले .

या सर्व विद्यार्थ्यांना शाळेतर्फे बक्षीसे देऊन उत्तेजन देण्यात आले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सीमा कवाष्टे यांनी केले. परिचय सौ वैशाली सातपुते यांनी केला .

पाहुणे व पालकांचे आभार निरुपमा देशपांडे यांनी मानले. फलक लेखन व उत्कृष्ट तयारी अश्विनी मेंद्रे ,सुकन्या बोल्ली,ठकू पवार, हेमांगी भिडे , प्राजक्ता मोरे या शिक्षिकांनी केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे