ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

मानसी देसाई यांना राज्यस्तरीय शांताराम पुरस्कार जाहीर

अहिल्यानगर

मानसी होलेहोन्नूर (देसाई) यांना नुकताच या वर्षीचा विदर्भ साहित्य संघाचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला.

‘पद्मगंधा’ या दिवाळी अंकातील ‘आनंद शोधुनी पाहे’ या कथेस त्यांना सर्वोत्कृष्ट कथेचा ‘शांताराम’ पुरस्कार घोषित झाला आहे.

पुरस्कार सोहळा विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापन दिनी नागपूर येथे १४ जानेवारी २०२६ रोजी संपन्न होणार आहे. मानसी या अहमदनगर महाविद्यालयाचे निवृत्त प्रा. वेंकटेश व विद्यालक्ष्मी होलेहोन्नूर यांच्या कन्या आहेत. त्यांचे शालेय शिक्षण महिला मंडळ बालक मंदिर वे समर्थ विद्यालय, सावेडी येथे झाले. पेमराज सारडा महाविद्यालय व पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांचे पुढील शिक्षण झाले.

मानसी यांचे गेली अनेक वर्षे पद्मगंधा, आवाज, ऋतूगंध, दीपलक्ष्मी या दिवाळी अंकात साहित्य प्रकाशित झाले आहे. विविध वर्तमानपत्रात त्यांचे लेख प्रकाशित होतात. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे