ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

दिलखुलास गप्पामहाराष्ट्र

सौ. अर्चना राहुल देवकर नेटके या आदर्श शिक्षिका तसेच कवयित्री यांच्या शी दिलखुलास गप्पा

अहिल्यानगर

सौ. अर्चना राहुल देवकर नेटके .राहणार अहिल्यानगर .मी मूळची अहिल्यानगर ची मी पोस्ट ग्रॅज्यूएट आहे.खूप काही स्वप्न मोठे नव्हते माझे.छोटेसे असे विश्व निर्माण करण्याचे ध्येय मनी होते धरले. शिक्षणाची आवड आणि त्यामधला आपले पणा जपला. सामाजिक कार्य थोड्या फार प्रमाणात सहभाग घेतला.लहान मुलांची आवड काही बसू देत नव्हते

त्यामुळे स्कूल मध्ये जॉईन केले. त्याच्यामध्ये रमने नवनवीन गोष्टी शिकवण्यात खूप आनंद मनी होतो.छंद काव्याचा लहान पानापासून जोपासला. अनेक अडथळे आले आवड माझी जपण्यात.मार्ग काढत त्यातूनी छंद माझा मी जोपासला. खूप काही शिकले त्यातून अनेक काव्य प्रकार ची माहिती मिळाली.लाडू काव्य, प्रतिमा काव्य, अठोळी काव्य अलक लेखन, थेंब काव्य, लंबकाव्य, शायरी,एक शब्द रचना काव्य अष्टकरी,पंचाक्षरी, सहाक्षरी, काव्य लिखाण तसेच अनेक काव्य स्पर्धेमध्ये प्रवीण्य मिळवले. चारोळ्या स्पर्धे मध्ये विशेष प्रविण्य आदर्श शिक्षक पुरस्कार आणि साहित्या क्षेत्रात विशेष कामगिरी.

आदर्श पत्नी, आदर्श आई, सुन , मुलगी, बहीण अश्या नात्याचा भार सांभाळत.कवीयत्रीचा भार मी सांभाळते.स्वप्न आणि छंद मी माझा जपोसते.खूप काही कमवयाचे आणखी आपली ओळख ही काव्य साहित्यानीं च व्हावी ही सार्थ इच्छा आहे माझी.

मिळालेले पुरस्कार- 

● आदर्श शिक्षक आणि कवियत्री

● 300 पेक्षा अधिक कविता लेखन

● 1000 हुन अधिक चारोळ्या लेखन

● दीप महोत्सव पुरस्कार प्राप्त

● नवदुर्गा पुरस्कार प्राप्त

● आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त

● फौंडेशन बिल्डर अवॉर्ड 

● कर्तृत्वान आई चा सन्मान

● सखी ती सन्मान

● जिल्हाधिकारी youth युवा पुरस्कार

● अनेक जिल्हा राज्य स्तरीय काव्य संमेलन सहभाग

● मुंबई,पुणे, संभाजीनगर येथे युवा क्रॉप्स म्हणून सन्मान

⭐हृदयदोर या काव्य संग्रहात प्रेम काव्य प्रकाशित.

⭐साजरी या काव्य संग्रहात बालकांव्य प्रकाशित

⭐स्त्रियाच्या आयुष्यातील अगदी मार्मिक विषय मासिक पाळी या विषयावर काव्य प्रकाशित

⭐बाप या विषयावर प्रतिनिधिक काव्य संग्रहात काव्य प्रकाशित

⭐सांजवेळ या काव्य संग्रहात प्रेम कविता प्रकाशित

⭐सलग 2 तास चारोळी स्पर्धेमध्ये सहभागी होऊन चारोळी सम्राज्ञी पुरस्कार प्राप्त

⭐बंध रेश्माचे या विषयावर चारोळी स्पर्धेमध्ये 100 पेक्षा अधिक चारोळ्या लिखाण करून विजेतेपद प्राप्त

⭐ अभंग लेखन स्पर्धेमध्ये सहभाग

तसेच 2 अभंग प्रकाशित

⭐ रेडिओ 107. 8 FM पुणे वर चारोळ्या सहभाग

अष्टक्षरी काव्य, पंचाक्षरी काव्य,चित्र काव्य,प्रतिमा काव्य, लाडू काव्य, अलकलेखन, थेबंकाव्य, विविध विषयावर लेख लेखन शायरी, आदि वर लिखाण…

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे