
ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था महाराष्ट्र शाखा अहिल्यानगर आयोजित चौथे युगस्त्री फातेमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन कवयित्री मेहमूदा रसूल शेख यांच्या अध्यक्षतेखाली, डॉक्टर सलीम सिकंदर शेख यांच्या स्वागताध्यक्ष खाली श्रीरामपूर येथे थाटात संपन्न झाले.

यावेळी बोलताना संमेलनाचे उद्घाटक डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले की, सावित्रीबाईच्या पत्रामध्ये असणारा फातिमाबी शेख यांचा उल्लेख त्यांच अस्तित्व असणारा महत्त्वाचा पुरावा असल्याचा उल्लेख करून फातिमाबी शेख यांचे काळजातले स्थान कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.
आज त्यांच्या नावाने साहित्यिक सोहळे साजरे होत आहेत. मुस्लिम मराठी स्त्री साहित्यिक मोठ्या प्रमाणात लिहीत आहेत. हा मराठी सांस्कृतिक संचिताचा गौरव आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक खाजाभाई बागवान व संस्थापक शफी बोल्डेकर यांनी केले. याच कार्यक्रमात स्पंदन स्मरणिका, युगस्त्री फातिमाबी शेख प्रातिनिधीक काव्यसंग्रह संपादन अनिसा सिकंदर शेख, तसेच त्यांचाच काव्यसप्तक हा काव्यसंग्रह, काळ काळांत, व अहमदनगर साहित्यिक सूची शब्बीर बिलाल, शेवटी सोबत काहीच येत नाही नसीम जमादार, खाजाभाई बागवान लिखीत “सांस्कृतिक सावल्या समिक्षा ग्रंथ या ग्रंथाचे प्रकाशन डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले.
फातिमाबी शेख साहित्यरत्न पुरस्कार सायराबानो चौगुले यांना तर अॅड. सिकंदर लतीफ शेख यांच्या स्मरणार्थ समाजभूषण पुरस्कार शहाजान शेख व मुख्याध्यापक हुसेनसाब बागवान यांच्या स्मरणार्थ आदर्श शिक्षक पुरस्कार निलोफर फणिबंद यांना प्रदान करण्यात आला.
जयंती निमित्त फातीमाबी शेखवर स्पर्धा घेण्यात आल्या ते बक्षीस पात्र यशवंत हिराबाई पगारे, कृष्णा अविनाश क्षीरसागर, ज्योत्स्ना डासाळकर, दादासाहेब शेख यांचा सन्मान करण्यात आला तसेच इख्लास रमजान अंकातील उत्कृष्ट कविता बा.ह मगदूम, सुमैय्या चौधरी, आलिया गोहर यांना सन्मानित करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून संस्थापक शफी बोल्डेकर, संस्थाध्यक्ष हाशम पटेल, संस्था सचिव डॉ. सय्यद जब्बार पटेल, प्राचार्य इ.जा. तांबोळी , गझलकार बा. ह. मगदूम, प्रा. सय्यद अल्लाउद्दीन आदि मान्यवर साहित्यिक उपस्थित होते.




