ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

पद्मशाली समाज सेवानिवृत्त संघाचे वतीने जेष्ठांचा सिंगी मळा हुरडा पार्टी संपन्न

सोलापूर

पद्मशाली समाज सेवानिवृत्त संघाचे वतीने सिंगी मळा कुमठे येथे अत्यंत खेळीमेळीच्या आणि उत्साही वातावरणात संपन्न झाले. सदर हुरडा पार्टी कार्याध्यक्ष सुरेश श्रीराम व अध्यक्ष श्रीहरी कुरापाटी यांचे नेतृत्वात आणि सचिव यशवंत इंदापुरे यांचे नियोजनाने जेष्ठांचे विरंगुळा आणि मंनोरंजना साठी आयोजित केले.

या पार्टीत संघाचे कार्यकारी सदस्या संगीता इंदापुरे,अरूणा कन्ना,भारती सग्गम, वरलक्ष्मी पल्ली, भाग्यलक्ष्मी व अनिलकुमार जन्यारम,चंद्रकला श्रीराम, नागनाथ संभारम, राजश्री व शाम बेनगिरी,विवेकानंद श्रीपती , व्यंकटेश पालाकुर्ती, ममता व श्रीनिवास बोलाबत्तीन, अनुराधा व देविदास मेरगू, रेणुका व अशोक पासकंटी,सुवर्णा व अशोक चलमेटी, लक्ष्मीबाई तुम्मा, गायत्री सुरा, नंदा दोंतुलवार आदी मान्यवर सहभाग नोंदविले.

सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्व जण सिंगी मळा येथे विविध कार व मोटारसायकल वर पोहोचले.

प्रथम विविध फळे नाष्टासाठी देण्यांत आले. थोड्या वेळाने उप्पीट व कांदा पोहे ही नाष्ट्याला दिले. त्यानंतर शेत शिवारात सर्वजण फेरफटका मारले तसेच पुरूष व महिला सदस्यांनी झोके खेळले. अंदाजे दुपारी बारा वाजता चविष्ठ हुरडा खाणेसाठी बैठक बसली. सर्वांनी हुरड्यावर मनसोक्त येथेच्छ ताव मारले. सर्वांना हुरडा खाल्यानंतर ताक ही दिले.

त्यानंतर काही महिलांनी विविध गाण्याच्या ठेक्यावर नृत्य केले तर वैशालीताई यनगंदूल आणि सोमय्या यनगंदूल युगल गाणे जोडीने मराठी भक्ती व भावगीत, तेलुगू हिंदी प्रेमगीते अत्यंत सुरेल आवाजात गाऊन सर्व जेष्ठांचे मनोरंजन केले. यावेळी सुरेश श्रीराम, व्यंकटेश पालाकुर्ती ,

श्रीनिवास बोलाबत्तीन आदींनी जेष्ठांनी कसे राहावे ? याबाबत विचार मांडले. दुपारी अंदाजे तीन कधी वाजले ते कळालेच नाही. मग स्वादीष्ठ असे सुरूची जेवण घेतले. सदर जेवणांवर ताव मारून मग विविध सामाजिक गोष्टीवर चर्चा करण्यांत सर्वांनी सहभाग घेतले.

सचिव यशवंत इंदापुरे यांनी हुरडा पार्टीचे आयोजन केले. उपाध्यक्ष अनिल कन्ना यांनी सर्व उपस्थितांचे आभार मांडले. दिवसभरात विविध ठिकाणी म्हणजे शेत शिवारात फिरतांना फोटो, व्हिडीओ काढण्यांत आले. शेवटी संध्याकाळी पांच वाजता अत्यंत प्रफुल्लीत आनंदी मनाने परतीचा प्रवास केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे