ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

पुढील ५ दिवस राज्यातील शाळांना सुट्टी

अहिल्यानगर

राज्यातील शाळांना पुढचे ५ दिवस सुट्ट्या असणार आहेत. मकरसंक्रांत आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, राज्य सरकारने याबाबत निर्णय घेतला आहे.

याचसोबत मतदान केंद्र असलेल्या शाळा आणि कार्यालयांना सुट्टी दिली आहे.राज्यातील शाळांना उद्या म्हणजेच १४ जानेवारीपासून सुट्ट्या असणार आहे. शाळा आता थेट पुढच्या सोमवारी सुरु होणार आहे.

१४ जानेवारी रोजी मकरसंक्रांत आहे. यानंतर १५ आणि १६ जानेवारीला महापालिका निवडणुका आहेत. १५ जानेवारीला महापालिका निवडणुकीसाठी मतदान तर १६ जानेवारीला मतमोजणी आहे. यानिमित्त शाळांना सुट्ट्या असणार आहे. अनेक शाळांमध्ये मतदान केंद्र आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

१५ आणि १६ जानेवारीला महापालिका निवडणुका झाल्यानंतर शनिवारी अनेक शाळांना सुट्टी असते. यानंतर रविवारी शाळांना सार्वजनिक सुट्टी असणार आहे. त्यामुळे उद्यापासून शाळांना ५ दिवस सलग सुट्टी असणार आहे.

अनेक सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना निवडणुकीसाठी ड्युटी लागली आहे. त्यामुळे महापालिका भागातील अनेक शिक्षक इलेक्शन ड्युटीवर आहेत. त्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

मतदानासाठी ज्या शाळांच्या इमारती, कार्यालये, सभागृह, संस्थांमध्ये मतदान केंद्राची निर्मिती केली आहे. त्यासाठी मतदानाच्या पूर्वतयारीसाठी उद्या आणि मतदानाच्या दिवशी या इमारतींमधील कामकाज बंद ठेवले जाणार आहे.

महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. मतदानाच्या एकदिवस आधी निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी झालेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना निवडणुकीचे साहित्य वाटप केले जाणार आहे.

ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी तसेच मतदान यंत्रांची वाहतूक, मतदान कक्षांची मांडणी, कायदा सुव्यवस्था, सुरक्षा व्यवस्था आदीची आदल्या दिवशी पूर्वतयारी करणे आवश्यक आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे