
Oppo आपली नवी Reno 15 Series 5G आज भारतात लॉन्च करण्यात आला. स्टायलिश डिझाइन, AI फोटोग्राफी आणि प्रीमियम फीचर्स यावर भर देत Oppo ने या सीरिजकडून मोठ्या अपेक्षा निर्माण केल्या आहेत. Reno 14 च्या पुढची पायरी म्हणून येणारी ही सीरिज तरुणांपासून कंटेंट क्रिएटर्सपर्यंत सगळ्यांना भुरळ घालणारी ठरली आहे.या वेळी Oppo कंपनी तीन वेगवेगळे स्मार्टफोन मॉडेल्स बाजारात आणत आहे. त्यामध्ये Oppo Reno15, Oppo Reno15 Pro आणि Oppo Reno 15 Pro Mini हे फोन आहेत. यातील Pro Mini हा एक नवा आणि थोडा वेगळा पर्याय असून, कॉम्पॅक्ट फोन आवडणाऱ्या युजर्ससाठी खास डिझाइन करण्यात आला आहे.
ही सगळी मॉडेल्स वेगवेगळ्या प्रकारच्या युजर्सच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. ज्यांना स्टायलिश लूक हवा आहे त्यांच्यासाठी एक पर्याय आहे, कॅमेरा प्रेमींसाठी वेगळा फोन आहे, तर चांगली परफॉर्मन्स आणि स्मूथ वापर हवे असणाऱ्यांसाठी आणखी एक मॉडेल देण्यात आले आहे.
त्यामुळे प्रत्येकाला आपल्या गरजेनुसार योग्य Oppo फोन निवडता येईल.भारतामधील या फोनची किंमत अंदाजे काय असू शकते, याबाबत काही रिपोर्ट्स समोर आले आहे.
त्या रिपोर्ट्सनुसार Oppo Reno 15 ची किंमत ५०,००० रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे, त्यामुळे हा फोन प्रीमियम फीचर्स हवे असणाऱ्या युजर्ससाठी चांगला पर्याय ठरू शकतो. तर Oppo Reno 15 Pro Mini हा फोन ४०,००० रुपयांच्या आत येण्याची शक्यता असून, कमी बजेटमध्ये स्टायलिश आणि पॉवरफुल फोन शोधणाऱ्यांसाठी तो आकर्षक ठरू शकतो.
Oppo Reno 15 Pro हा फोन थोडा महाग असण्याची शक्यता आहे आणि त्याची किंमत मागील Reno 14 Pro पेक्षा जास्त असू शकते. लॉन्च झाल्यानंतर हे सगळे स्मार्टफोन फ्लिपकार्ड, अमेझोन तसेच ओपपो च्या अधिकृत वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध होतील, त्यामुळे ग्राहकांना हव्या त्या प्लॅटफॉर्मवरून सहज खरेदी करता येईल.
या Reno 15 सीरिजमध्ये डिझाइनवर विशेष लक्ष देण्यात आलं आहे. iPhone Pro सारखा कॅमेरा लेआउट आणि Aerospace-grade aluminium frame यामुळे हे फोन खूपच प्रीमियम दिसतात.
Reno 15 Pro हे मॉडेल Cocoa Brown आणि Sunset Gold या रंगांमध्ये येणार आहे. Reno 15 Pro Mini मध्ये Cocoa Brown आणि Glacier White हे पर्याय असतील. तर Reno 15 हा फोन Glacier White, Twilight Blue आणि Aurora Blue या आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
डिस्प्लेबाबत पाहिलं तर Reno 15 Pro मध्ये मोठा ६.७८-इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, तर Pro Mini मध्ये ६.३२ -इंच AMOLED स्क्रीन मिळते. Reno 15 मध्ये ६.५९ -इंच AMOLED डिस्प्ले असणार आहे. स्क्रीन सुरक्षित राहावी यासाठी Gorilla Glass चा वापर करण्यात आला आहे.
परफॉर्मन्सच्या बाबतीत Pro आणि Pro Mini मध्ये Dimensity 8450 प्रोसेसर, तर Reno 15 मध्ये Snapdragon 7 Gen 4 प्रोसेसर देण्यात आला आहे.




