AR न्युज लेडीज स्पेशल चॅनेल आयोजित संक्रांत निमित्त शाॅपिंग फेस्टिव्हल 2026 उत्साहात उद्घाटन संपन्न
अहिल्यानगर

AR न्युज लेडीज स्पेशल चॅनेल आयोजित संक्रांत निमित्त शाॅपिंग फेस्टिव्हल 2026 दिनांक 3 आणि 4 जानेवारी आम्रपाली मंगल कार्यालय मध्ये आयोजित केला होता..

उद्घाटन समारंभ यांच्या हस्ते- ॲडव्हकेट सुविधा तांबोळी(नोटरी पब्लिक गव्हरमेंट ऑफ इंडिया, व्हाईस प्रेसिडेंट अहमदनगर डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर बार असोसिएशन..) श्री सुभाष दत्तात्रेय जाधव (री फॉरेस्टर) (योगा निसर्गोपचार तज्ञ ,योग शिक्षक ,एक्यूप्रेशर- एक्यूपंक्चर,एम .ए. सायकोलॉजी.) यांच्या उपस्थितीत डाॅ. ऐश्वर्या शहा – देवी(नॅचरोपॅथी तज्ञ – आरोग्यवर्दीनी संस्थेवर पदाधिकारी..) राज्यस्तरीय भारत ज्योती प्रतिभा सन्मान. एक्सलन्स पुरस्कार. मिसेस नगर रनर अप अवॉर्ड .महाराष्ट्र लेजंड वुमन अवॉर्ड., डाॅ. अब्दुल कलाम राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार, सौ. प्राची अमोल थिगळ (प्राची किएशन- प्रसिद्ध आर्टिस्ट) ग्लोबल स्टार आर्टिस्ट अवॉर्ड यांच्या सर्वांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

त्यानंतर डाॅ. ऐश्वर्या शहा देवी मॅडम यांनी त्यांच्या मनोगत मध्ये सांगितले की महिलांची मानसिकता बदलायलाच हवी.. हेच मनाचे खर सौंदर्य आहे..त्यासाठी त्यानी वेगवेगळे उदा. देऊन महिलांनी कसे स्वतःला बदलेले पाहिजे हे खुपच साध्या सुंदर शब्दात सांगितले..

ॲड. सुविद्या तांबोळी यांनी त्यांच्या मनोगत मध्ये सांगितले की महिलांनी बोलायला शिकायला पाहिजे, एक महिला शिकली की अख्ख घर चालवते. त्याबरोबरच छोटी छोटी उदा. देऊन महिलांना स्वावलंबी कस होता येईल ते सांगितले..

प्राची किएशन- प्राची थिगळे मॅडम नी त्यांच्या मनोगत मध्ये सांगितले की मार्केटिंग कशी करायची याबाबत उदाहरण देऊन महिलांना प्रोत्साहन दिले..

शेवटी अध्यक्षीय भाषण जाधव सरांनी निसर्गोपचार पध्दत, निसर्गोपचार म्हणजे काय.. हे थोडक्यात सांगितले.. आणि कार्यक्रम ची सांगता होत असताना सर्व स्टाॅल धारकांना AR न्युज लेडीज स्पेशल चॅनेल आयोजित संक्रांत शाॅपिंग फेस्टिव्हल मध्ये सहभागी झाल्याबद्दल सर्टिफिकेट देण्यात आले..

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ. आरती जोशी यांनी खुप छान प्रकारे केले.. सर्व महिलांचा उत्साह वाढवत वातावरण हसत खेळत ठेवले..

होम मिनिस्टर कार्यक्रम अँकर- प्रणाली कुलकर्णी – क्षिरसागर यांनी होम मिनिस्टर कार्यक्रमाची माहिती सांगितली..

कार्यक्रमच्या शेवटी सर्व स्टाॅल धारकांना पाहुण्यांचा हस्ते सर्टिफिकेट देण्यात आले.. आणि आभार प्रदर्शन करुन कार्यक्रमाची सांगता झाली.. आणि शाॅपिंग फेस्टिव्हल ला सुरवात झाली.





