अहिल्यानगरमध्ये महानगरपालिका निवडणुकीतील मनसेचे 2 उमेदवार गायब

अहिल्यानगर पालिका निवडणुकीतील मनसेचे 2 उमेदवार गायब झाल्याची माहिती समोर आलीये. गेल्या 24 तासांपासून उमेदवारांचा कुटुंबाशी संपर्क नसल्याचं मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी दिलीये.. केडगाव भाग हा संवेदनशील असल्याने निवडणूक बिनविरोध होण्यासाठी 2 उमेदवारांचं अपहरण केल्याचा संशय विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी व्यक्त केलाय…
राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग असं गायब झालेल्या उमेदवारांची नावं आहे.. महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मनसेचे दोन उमेदवार गायब झालेत.२४ तासांपासून उमेदवारांचा त्यांच्या कुटुंबाशी संपर्क झाला नाहीये. या घटनेने अहिल्यानगरमध्ये खळबळ उडाली आहे.
दोन उमेदवार गायब झालेल्याची माहिती मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ आणि सुमित वर्मा यांनी दिलीय. दरम्यान केडगाव भाग हा संवेदनशील असल्याने निवडणूक बिनविरोध होण्यासाठी दोन उमेदवारांचे अपहरण केले असावे असा संशय विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी व्यक्त केलाय.
राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग असे गायब झालेल्या उमेदवारांची नावे आहेत. याप्रकरणी मनसेचे पदाधिकारी तक्रार दाखल करण्यासाठी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेत.
पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन केली तपासाची मागणी केली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, दोन उमेदवारांपैकी एक उमेदवार भारतीय जनता पार्टी आणि दुसरा उमेदवार अजित पवार गटाच्या उमेदवाराविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणता होते. राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग हे प्रभाग क्रमांक सतरामधील उमेदवार आहेत.




