ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक 788 पैकी 17 उमेदवारी अर्ज बाद

अहिल्यानगर

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 17 प्रभागांतील 68 जागांसाठी इच्छुक उमेदवारांनी तब्बल 788 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. बुधवारी विविध ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांसमोर उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली.

या छाननीत 788 पैकी 17 उमेदवारी अर्ज अवैध ठरवत बाद करण्यात आले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली.दरम्यान,

अर्ज छाननीदरम्यान एबी फॉर्मवर खाडाखोड, अनुमोदकांच्या सह्या चुकीच्या असणे, एबी फॉर्मची झेरॉक्स प्रत जोडणे, तसेच काही प्रकरणांत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्याचे प्रकार समोर आले. या त्रुटींमुळे संबंधित उमेदवारांचे अर्ज फेटाळण्यात आले.

महापालिकेच्या 68 जागांसाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, एमआयएम, आम आदमी पार्टी, बसपा तसेच अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

तहसील कार्यालय सावेडी, प्रभाग समिती क्रमांक 1 सावेडी, भूसंपादन कार्यालय सावेडी, जुने महापालिका कार्यालय, प्रभाग समिती क्रमांक 4 बुरुडगाव तसेच केडगाव उपकार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकार्‍यांसमोर उमेदवार, सूचक व अनुमोदकांच्या उपस्थितीत अर्जांची छाननी करण्यात आली.

दरम्यान, विविध प्रभागांमध्ये उमेदवारांच्या अर्जांवर हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. अतिक्रमण, महापालिकेची करथकबाकी, एबी फॉर्मवरील खडाखोड, सह्या चुकीच्या असणे अशा स्वरूपाच्या हरकतींची दुपारी सुनावणी घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी सुनावणीनंतर बहुतांश हरकती निकाली काढल्या.

छाननी अंती शिवसेनेच्या पाच उमेदवारांचे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या एका उमेदवाराचा अर्ज बाद ठरला आहे. शिवसेनेच्या काही उमेदवारांना ऐनवेळी पक्षात प्रवेश देण्यात आल्याने एबी फॉर्मवर व्हाईटनरचा वापर, खडाखोड व झेरॉक्स प्रती सादर केल्याचे आढळून आले.

मात्र, संबंधित उमेदवारांचे अपक्ष अर्ज ग्राह्य धरण्यात आले असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. आता 2 जानेवारी 2026 पर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेता येणार असून, त्यानंतरच प्रत्येक प्रभागातील निवडणूक चित्र स्पष्ट होणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे