ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

सहजयोग प्रचाराचे कार्य हे दैवी कार्य आहे – मा. नगरसेविका सौ. वीणा बोज्जा

भिस्तबाग चौकात चैतन्य रथाचे भव्य स्वागत..

प. पु. माताजी श्री निर्मला देवी यांच्या परम कृपेत सहजयोग परिवार महाराष्ट्र राज्याचे वतीने चैतन्य रथाचे आयोजन करण्यात आले असून सदर संपूर्ण महाराष्ट्रात भ्रमण करीत असून सदर रथाचे अहिल्यानगर मध्ये आगमन झाले असता भिस्तबाग चौकात सहजयोग परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले.

या वेळी सहजयोगी मा. नगरसेवक वाय प्रकाश टेलर, मा. नगरसेविका सौ. वीणाताई बोज्जा, राजेंद्र द्यावनपेल्ली, अविनाश महाजन आदी उपस्थित होते. या वेळी बोलतांना मा. नगरसेविका वीणा बोज्जा म्हणाले हा चैतन्य रथ संपूर्ण महाराष्ट्रात फिरतोय आज अहिल्यानगर मध्ये आलेले असून सहजयोग चे कार्य हे पवित्र कार्य असून याचा प्रचार प्रसार करणेसाठी भाग्य लागते म्हणूनच या कार्याला दैवी कार्य म्हणवे लागेल असे बोज्जा म्हणाले.

या वेळी सदर चैतन्य रथ भिस्तबाग चौकात आल्यानंतर ढोल ताशा,फटाके वाजवून व आरती करून चैतन्य रथाचे स्वागत सहजयोग्यानी केले. सादरीत चैतन्यरथ भिस्तबाग चौकातून जॉगिंग ट्रॅक तसेच पाईप लाईन रोड वरील भाजी मार्केट येथे येणाऱ्या लोकांना सहजयोगाची माहिती देऊन जागृती देण्यात आली.

या वेळी सहजयोग परिवारातील सौ. कोमल छाजेड , सौ. किरण येनगंदुल, श्रीमती बुरा, सौ. शिंदे सुनीता, श्रीमती सुहासिनी वल्लाकट्टी, कु. सुश्मिता शिंदे, श्रीमती सोनाली बोज्जा, सौ. राणी बोज्जा कु. साक्षी जोग सौ. सुवर्णा मंचे, सौ.रुपाली क्यादर, सौ. नोमूल, सौ. पंतम, सौ. ज्योती रच्चा, सौ. सुजाता रच्चा , सौ. विद्या जोग ,सौ. सीमा जाधव, अशोक येनगुल, योगेश श्रीगादी,कळसे सर,पंतम काका आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे