ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर शहरात पहाटेपासून पाऊस सुरूच, कार्यालयीन वेळेत नागरिकांची, विद्यार्थ्यांची तारांबळ

अहिल्यानगर

अहिल्यानगर शहरात आज पहाटेपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. सकाळच्या वेळेत पावसाचा जोर कायम राहिल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीचा वेग मंदावला, तर अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

शाळा सुरू होण्याच्या वेळेतच पाऊस सुरू असल्याने विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडाली. अनेक विद्यार्थी रेनकोट व छत्रीच्या साहाय्याने शाळेत पोहोचले, तर लहान मुलांना पालकांनी स्वतः शाळेत सोडण्यासाठी धावपळ केली. काही ठिकाणी शाळेबाहेर पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांना पाण्यातून वाट काढत शाळेत जावे लागले.

शहरातील सखल भाग, चौक आणि अंतर्गत रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. कार्यालयीन वेळ असल्याने कामावर जाणाऱ्या नागरिकांनाही पावसाचा सामना करत प्रवास करावा लागला. .

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे