ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

सावेडीत भरदिवसा बंगला फोडला, १५ लाखाचा ऐवज लंपास

अहिल्यानगर

शहरातील सावेडी उपनगरातील विराज कॉलनी येथे अज्ञात चोरट्यांनी बंद बंगल्याचे कुलूप तोडून मोठी चोरी केली आहे. व्यावसायिक अशोककुमार अग्रवाल यांचे कुटुंब जयपूर येथे नातेवाईकांकडे गेले असताना ही घटना घडली.

चोरट्यांनी घराच्या मागील दरवाजाचा कडा-कोंडा तोडून आत प्रवेश मिळवला. घरातील दोन्ही बेडरूममधील कपाटांचे लॉकर फोडून ७ लाख रुपयांची रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. यामध्ये सोन्याच्या अंगठ्या, चैन, मंगळसूत्र, हातातील कडे, हिऱ्यांचे पेंडंट आणि चांदीच्या भांड्यांचा समावेश आहे. चोरीचा पुरावा नष्ट करण्यासाठी चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची हार्ड डिस्कही पळवून नेली.

घराची साफसफाई करणाऱ्या महिलेला दरवाजा उघडा दिसल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करून तपास सुरू केला आहे. भरवस्तीत झालेल्या या धाडसी चोरीमुळे खळबळ उडाली आहे.

पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. नागरिकांनी बाहेरगावी जाताना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे