ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

​अहिल्यानगर शहरात महिलेवर चाकूने सपासप वार, कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अहिल्यानगर

​अहिल्यानगर शहरातील मल्हार चौक परिसरात किरकोळ वादातून एका महिलेवर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बाळासाहेब मल्हारी भंडारकर याच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​

मिळालेल्या माहितीनुसार, मल्हार चौक, स्टेशन रोड येथे ही घटना घडली. आरोपी बाळासाहेब भंडारकर याने फिर्यादी महिलेला विनाकारण शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. रागाच्या भरात आरोपीने जवळ असलेल्या भाजी कापण्याच्या चाकूने महिलेवर सपासप वार केले. घटनेनंतर जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ​

कोतवाली पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सोनवणे करत आहेत. भरवस्तीत झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे