ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

श्री चैतन्य टेक्नो सीबीएससी शाळेच्या विद्यार्थिनीची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

अहिल्यानगर

नगर–कल्याण रोडवरील जाधवनगर येथील श्री चैतन्य टेक्नो सीबीएससी शाळेची इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कु. शौर्या शैलेश गवळी हिने दि. १६ व १७ डिसेंबर रोजी आबासाहेब काकडे महाविद्यालय, शेवगाव (जि. अहिल्यानगर) येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.

या कामगिरीच्या जोरावर तिची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी १७ वर्षाखालील मुलींच्या संघात निवड झाली असून तिने शाळेचे व शहराचे नाव उज्वल केले आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल अहिल्यानगर शहराचे जिल्हा क्रीडा अधिकारी मा. ज्ञानेश्वर खुरांगे यांच्या हस्ते कु. शौर्या गवळी हिचा विशेष सत्कार व कौतुक करण्यात आले. यावेळी बोलताना जिल्हा क्रीडा अधिकारी खुरांगे म्हणाले की, श्री चैतन्य टेक्नो शाळेने अल्पावधीतच अहिल्यानगर शहरात शैक्षणिक क्षेत्रात भक्कम स्थान निर्माण केले असून, आजच्या या यशामुळे ही शाळा केवळ शिक्षणातच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातही अग्रेसर असल्याचे स्पष्ट होते.

या प्रसंगी शाळेच्या प्राचार्या सौ. के. एन्सी, अकॅडमिक डीन श्री. सुमन, श्री. शशी कुमार यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. सर्वांनीच कु. शौर्या हिचे अभिनंदन केले. तिला शाळेचे क्रीडा प्रमुख श्री. सुनील मोहिते, क्रीडाशिक्षक श्री. आदित्य क्षीरसागर तसेच बेसबॉलचे एनआयएस प्रशिक्षक श्री. सोमनाथ सपकाळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

शौर्या हिच्या यशामध्ये शाळेबरोबरच पालकांचाही महत्त्वाचा वाटा असल्याचे प्राचार्यांनी नमूद केले. अहमदनगर ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष व महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे सचिव श्री. शैलेश गवळी यांची ती कन्या असून, खेळाची आवड व शिस्त घरातूनच जोपासली गेल्याचे त्यांनी सांगितले. दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी कु. शौर्या हिला सर्व स्तरांतून शुभेच्छा देण्यात आल्या.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे