ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

‘गुगल गर्ल’ परिणीता दुधगुंडीचा पद्मशाली सखी संघमच्या वतीने सन्मान

सोलापूर - कोटी पेक्षा जास्त पॅकेज मिळवल्याबद्दल सोलापूरची पद्मशाली समाजाची कन्या परिणीता मदन दुधगुंडी हिचा सन्मान पद्मशाली सखी संघमचे अध्यक्षा ममता मुदगुंडी यांनी सोलापूरी टॉवेल व नॅपकीन बुके देऊन केले.

पुर्वाश्रमीचे पूर्व भागातील रहिवासी व सध्या हैदराबाद येथे स्थायिक असलेल्या मदन दुधगुंडी यांची कन्या ‘परिणीता’ ही शिक्षण आणि बुध्दिमत्तेच्या कौशल्यावर ‘गुगल’ मध्ये तब्बल सव्वा कोटी पेक्षा जास्त पॅकेज मिळाल्याबद्दल सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संघमच्या वतीने आज शनिवारी सकाळी ‘गुगल गर्ल – परिणीता’चा सन्मान करण्यात आले आहे.

फाउंडेशन व सखी संघमचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम घेण्यात आला. परिणीता दुधगुंडी हिचा सन्मान पद्मशाली सखी संघमचे अध्यक्षा ममता मुदगुंडी यांनी सोलापूरी टॉवेल व नॅपकीन बुके देउन केले.

यावेळी सखी संघमचे सहसचिवा ममता तलकोकूल, खजिनदार दर्शना सोमा, समन्वयिका कला चन्नापट्टण, दुर्गा रेस, सुधीर सोमा (पुरोहित), ॲड. सूरज दुधगुंडी, प्रफुल्ल दुधगुंडी, अश्विनी दुधगुंडी, रेखा अन्नलदास, वर्षा मामड्याल, मंजुळा दुधगुंडी आणि दुधगुंडी कुटुंबातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे