ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

कोथिंबीर ४०रुपये जुडी, कारले १०० तर शेवगा ११० रुपये किलो

अहमदनगर

यंदा मान्सूनचा पाऊस वेळेवर दाखल झाला आहे. मात्र पावसाळा सुरू होताच रोज लागणाऱ्या हिरव्या पालेभाज्यांचे दर कडाडले आहेत. कडधान्यांसह डाळींच्या किमती तर यापूर्वीच वाढल्या आहेत. पालेभाज्यांच्या दरांनी तर शंभरी गाठली आहे. मान्सूनचा पाऊस पडल्याने अनेक भागांतील शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शेतमाल खराब झाल्याने त्याची आवकही घटली आहे.आवक घटल्याने दर वाढले आहेत. यामुळे भाज्यांच्या दरात २० ते ३० रुपयांची वाढ झाली आहे . यात सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणात प्रामुख्याने वापरण्यात येणारी कोथिंबीर सर्वसामान्यांच्या आटोक्याबाहेर गेली आहे. सध्या कोथिंबीरच्या एका जुडीला ३५ ते ४० रुपये असा दर मिळत आहे.

पावसाने पिकांना चांगले झोडपून काढल्याने कोथिंबीर जागेवरच खराब झाली. परिणामी कोथिंबीर सर्वात महाग विकली जात आहे. पालेभाज्यांच्या दरात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली. किरकोळ बाजारात कोथिंबरीच्या एका जुडीच दर ४० रुपये आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर पालेभाज्या लागवडीस किमान महिनाभराचा कालावधी लागेल. त्यामुळे किमान महिनाभराचा कालावधी लागेल.

प्रत्येक भाजीचे दर हे १० ते २० रुपये प्रतिकिलोमागे वाढले आहेत. दरम्यान, सर्वांत महाग सध्या टोमॅटो झाले आहेत. यापूर्वी ३० रुपये प्रतिकिलोने मिळणाऱ्या टोमॅटोचा दर आता ७० रुपयांच्या घरात गेला आहे.

हिरव्या पालेभाज्यासुद्धा चांगल्याच कडाडल्या आहेत. भेंडीचे दर ८० रुपये प्रतिकिलो झाले आहेत. ४० ते ५० रुपये किलो दराने मिळणारे वांगे आता ६० ते ८० रुपये झाले आहेत. चवीला कडू असलेले कारले ८० ते १०० रुपये किलो तर शेवगा ११० रुपये किलो या दराने विकला जात आहे.

नगर बाजार समितीत मिळालेले दर :

टोमॅटो ५०० – ५५००, वांगी ५०० – ४०००, फ्लावर १००० – ५०००, कोबी ८०० – २२००, काकडी ५०० – ३५००,

गवार ४००० – १०,०००, घोसाळे १००० – ६०००, कारले ३५०० – ८०००, भेंडी १००० – ६०००, घेवडा १३००० – १६०००, बटाटे १२०० – २८०००, लसूण ६००० – १८०००, हिरवी मिरची ३००० – ७०००, शेवगा ४५०० – ११०००, भु. शेंग ३००० – ४५०००, लिंबू १००० – ६०००, गाजर २००० – २६००, दू. भोपळा ६०० – २०००, शि. मिरची १५०० – ५०००, मेथी ८०० – २०००, कोथंबीर ४५०० – ११,१००, पालक २००० – ४०००, शेपू भाजी ४६०० – ६६००, चवळी ३००० – ६०००, बीट २००० – ३०००.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे