आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र
अहमदनगर मधील सावेडी भागात बालगोपाळांनी फोडली खेळणी दहीहंडी..
अहमदनगर प्रतिनिधी

अहमदनगर सावेडी भागात नरहरी नगर मधील किड्स क्लब मधील प्ले ग्रुप, नर्सरी च्या बालगोपालांनी दहीहंडी फोडून आनंदोत्सव साजरा केला.
सावेडी भागातील किड्स क्लब या स्कूल मधे सर्व सण साजरा केले जातात. त्यामुळे लहान मुलांना आत्ता पासुन च हिंदू धर्मातील प्रत्येक सण वाराचे महत्त्व ही सांगितले जाते..
आज सर्व बालगोपाल खुप छान वेशभूषा करून आले होते. दहिहंडी फोडताना मुलांच्या चेहऱ्यावर खुप वेगळाच आनंद पहायला मिळत होता. त्यानंतर मुलांना खाऊ वाटप ही करण्यात आले..