एक आई किती शिकली आणि ती कोणत्या क्षेत्रातील आहे त्याला महत्व नाही..तिने आपल्या मुलांना काय संस्कार दिले याला महत्व आहे.- माननीय राणी ताई लंके..
अहिल्यानगर

AR न्युज लेडीज स्पेशल चॅनेल आयोजित मातृदिवस निमित्ताने कर्तृत्ववान विविध क्षेत्रातील आई चा सन्मान सोहळा 2025 अहिल्यानगर मध्ये महिलांच्या उत्साहात संपन्न झाला…
अहिल्यानगर मधील तारकपुर रोड वरील हाॅटेल V स्टार येथे सकाळी ११.३० ते ४ वाजेपर्यंत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सकाळी ११ वाजल्यापासून सगळ्या कर्तृत्वान आई छान नटुन थटून येत होत्या.. आल्या आल्या फेटा आणि बॅच देऊन AR न्युज लेडीज स्पेशल चॅनेल च्या मुख्य संपादिका सौ. श्रुती बत्तीन मॅडम नी त्यांचे स्वागत केले.. हाॅल मध्ये आल्यावर आपल्या मैत्रिणींसोबत हसुन खेळून फोटो सेशन चालु झाले..
मान्यवर पाहुणे माननीय सौ. राणीताई निलेश लंके मा.जि.प. सदस्या तथा जिल्हा नियोजन समिती सदस्या अ.नगर..माननीय सौ. नम्रता ताई गौड – भाजपा. महिला शहर अध्यक्षा अल्पसांखिक मोर्चा पुणे.माननीय सौ. वैशाली नराल मॅडम – संचालिका – कस्तुरबा फाउंडेशन अ. नगर. माननीय डाॅ. सौ. मधु कदम – महिला तालुकाध्यक्ष – नगर तालुका या पाहुण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आले..
बालशाहिर ओवी काळे हिचा सुंदर असे दोन पोवाडे जिजाऊ माता आणि शिवाजी महाराज यांच्या वर सादर करण्यात आले होते. उपस्थितीत सन्मानार्थी आणि त्यांच्या सोबत आलेल्या पाहुण्यांनी टाळांच्या कडकडाटात ओवी च्या पोवाड्यांना दाद दिली..
राणी ताई त्यांच्या मनोगतातून म्हणाल्या की एक आई किती शिकली आणि ती कोणत्या क्षेत्रातील आहे त्याला महत्व नाही..तिने आपल्या मुलांना काय संस्कार दिले याला महत्व आहे.तिनी आपल्या मुलांना चांगल घडवणे हि तिच्या आई पणाची खरी पावती.. आता च्या काळात नुसतेच चुल आणि मुल राहिले नसुन महिला सगळ्याच क्षेत्रात आज पुरुषांच्या बरोबर आहेत.. पण हे सगळे करत असतानाच तिच्यावर जबाबदार्या ही असतात. आज या कार्यक्रमात अहिल्यानगर मधील तसेच सगळ्या जिल्ह्यातील महिला खुप लांबून आल्या आहेत. त्यांना राणी ताई आणि खासदार निलेश लंके साहेबांकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..
डाॅ. मधु कदम आणि वैशाली नराल मॅडम यांनी उपस्थितीत कर्तृत्वान आईंना काही संदेश देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..
नम्रता ताई गौड या त्यांच्या मनोगतातून म्हणाल्या की आई ची आपण किती रुप बघतो अनुभवतो.. एक आई आपल्या मुलांसाठी काय काय करू शकते हे त्यांनी छोटी छोटी उदाहरण देऊन पटवून सांगितली..
कार्यक्रमात रंगात आला असताना उपस्थित आईंनी आपले चांगले वाईट अनुभव मनोगतातून शेअर करत असतानाच त्यांचे डोळे भरून आले होते.. काहींनी आपले मनोगत कविता , कव्वाली, शेर, पोवाडा यातुन व्यक्त करत होत्या..
त्यानंतर सन्मान सोहळ्याला सुरवात झाली..कर्तृत्ववान आईंना ट्रॉफी, सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले.त्या वेळेस प्रत्येक सन्मानार्थी आई च्या चेहर्यावर एक आनंद दिसत होता..
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅक्टर आरती कुलकर्णी, डाॅक्टर रत्ना बल्लाळ यांनी केले.. त्याच बरोबर आरती छिंदम, निता बुरा, साधना कोल्पेक यांनी ही परीश्रम घेतले..
AR न्युज लेडीज स्पेशल चॅनेल च्या मुख्य संपादिका यांनी उपस्थित मान्यवर आणि कर्तृत्ववान आईंचे आभार मानले..