ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

माजी आमदार अरुणकाका जगताप यांचे निधन

अहिल्यानगर- नगरकरांनी एक अनुभवी, अभ्यासू आणि समाजाभिमुख नेता गमावला आहे.त्यांचे कार्य कायम स्मरणात राहील.

अहिल्यानगरच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात महत्त्वपूर्ण योगदान देणारे ज्येष्ठ नेते अरुणकाका बलभीम जगताप यांचे आज, २ मे २०२५ रोजी दुःखद निधन झाले. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६७ वर्षांचे होते.

नगर शहरात आणि परिसरात लोकप्रिय असलेले अरुणकाका यांचे समाजकारण व राजकारणातील योगदान लक्षणीय होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण अहिल्यानगरसह जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन त्यांच्या राहत्या घरी, सारसनगर, भवानीनगर येथे ठेवण्यात येणार आहे. दुपारी २ वाजता दर्शनासाठी खुले ठेवण्यात येईल, तर अंत्यसंस्कार दुपारी ४ वाजता अमरधाम स्मशानभूमीत, अहिल्यानगर येथे होतील.

अंत्ययात्रेचा मार्ग

भवानीनगर येथील निवासस्थान → महात्मा फुले चौक → मार्केट यार्ड → जिल्हा सहकारी बँक → स्वस्तिक चौक → टिळक रोड → आयुर्वेद कॉलेज, बाबावाडी → नालेगाव → अमरधाम..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे