तथागत ग्रुप ने केले विविध क्षेत्रातील नामवंतांना सन्मानित
तिरस्काराच्या विषारी वातावरणात पुरस्कार बनतो नवसंजीवनी..-भाई कैलास सुखधाने

मेहकर – आज दि ९ मार्च २०२५ रोजी स्थानिक मेहकर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटिका, अशोका भवनमध्ये तथागत बहुउद्देशीय संस्था मेहकर व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना,जिवन दिप अनाथ आश्रम व वृध्दाश्रम तसेच राजमाता माँ जिजाऊ स्वयंसहाय्यता महिला बचत गट यांच्या वतीने नॅशनल पिपल लिडरशीप अवॉर्ड राज्यस्तरीय पुरस्कार वितरण तसेच माजी सैनिक सन्मान सोहळ्याचे आयोजन तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांच्यावतीने आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाई कैलास सुखधाने हे होते यावेळी बोलतांना भाई कैलास सूखधाने म्हणाले आज संपुर्ण महाराष्ट्रात दूषित वातावरण निर्मान झाले आहे. बीड, परभणी सारख्या घटणा तिरस्काराचे बीज पेरत आहेत. अशा परिस्थितीत तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्यातील गुणवंतांना पुरस्कार वितरीत करीत आहेत.
हा पूरस्कार सर्वसामासान्याठी नवसंजीवनी देणारा ठरत आहे. असे त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगीतले.
या कार्यक्रमाचे उद्घाटक सौ.आरती सार्थक दिक्षित ह्या होत्या.प्रमुख उपस्थितांमध्ये सोपानराव देबाजे, रफिकभाई कुरेशी, अरुण डोंगरे, रवि मिस्कीन, सुमेर खान,छोटु गवळी,सिद्धार्थ वानखेडे, प्रकाश सुखधाने, गजानन सरकटे, मुख्याध्यापिका सौ. मीनल जोहरे, प्रतिभा गवई, निता पैठणे, कांचन मोरे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध,राजमाता माँ जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुष्पमाला अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रमुख अतिथींच्या स्वागत, सत्कारानंतर तथागत ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांनी प्रास्तविक केले.
त्यानंतर मुख्य नॅशनल पिपल लिडरशीप अँवार्ड व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार कर्त्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.यामध्ये नँशनल पिपल लिडरशीप अँवार्ड व राजमाता माँ.जिजाऊ गौरव सन्मान पुरस्कार तसेच साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार देण्यात आला.
तसेच महिला दिनाचे औचित्य साधुन उपस्थित महिला भगिणिंचा सत्कार व माजी सैनिकांचा सत्कार सुद्धा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे बहारदार आणि अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन युवा नेते युनुसभाई पटेल यांनी तर आभारप्रदर्शन तथागत ग्रुपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष कुणाल माने यांनी केले.उत्कृष्ट कार्यक्रम केल्याबद्दल सर्व मान्यवरांनी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना व संदीपभाऊ गवई यांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कांता राठोड, सुनिल वनारे, संदिप राऊत, गौतम पैठणे, मनोज बागडे, रविद्र वाघ, देवानंद वानखेडे यांनी अथक परिश्रम घेतले.