ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजन

अभिनेत्री प्रार्थनाचा मुंबईला कायमचा जय महाराष्ट्र

प्रार्थना बेहेरेने नुकताच तिचा स्वतःचा यूट्यूब चॅनल सुरू केला. तर सध्या मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी प्रार्थना तिच्या स्वतःच्या या नवीन यूट्यूब चॅनलवरून सर्वांच्या भेटीला येत आहे. या तिच्या चॅनलवर नुकताच तिने एक नवीन व्हिडीओ पोस्ट केला. त्यामध्ये तिने ती अलिबागला कायमची शिफ्ट झाल्याचं सांगत तिने त्यांच्या आलिशान घरातील बागेची झलक दाखवली.

ती म्हणाली, “हे घर मी आणि माझ्या नवऱ्याने खूप प्रेमाने आणि मनापासून बनवलं आहे. त्यामुळे या घरासाठी माझ्या हृदयात एक खास जागा आहे. सुरुवातीच्या दिवसांमध्ये मला थोडा त्रास झाला. मला वाटायचं की मुंबईत आपलं सगळं काम आहे आणि ते सगळं सोडून अलिबागला कायमचं कसं शिफ्ट व्हायचं? मी हे सगळं कसं सांभाळू शकेन असा मला प्रश्न पडला होता. पण खरं तर हे सगळं सांभाळणं खूप सोपं आहे हे मला नंतर कळलं.”

पुढे ती म्हणाली, “आमच्या या घरापासून १५ मिनिटांवर मांडवा आहे. तिथून मुंबईला जाण्यासाठी जेट्टी, बोट्स, रोरो मिळतात. रोरो मध्ये आपण आपली कार टाकून ४५ मिनिटांत मुंबईला पोहोचतो.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे