ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहमदनगरमध्ये युवकाच्या डोक्यात गोळी घुसून तो जखमी

अहमदनगर

नगर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील गजराजनगर परिसरात काल (गुरूवारी) सायंकाळी साडे सातच्या सुमारास एका युवकाच्या डोक्यात गोळी घुसून तो जखमी झाल्याची घटना घडली.

किरण दत्तात्रय मांजरे (वय 23 रा. गजराजनगर) असे जखमी युवकाचे नाव आहे. दरम्यान, काळामाथा येथील बीटीआर या लष्कराच्या प्रशिक्षण केंद्रात रात्रीच्यावेळी सुरू असलेल्या सरावादरम्यान मांजरे याला गोळी लागून तो जखमी झाला असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी दिली.

किरण मांजरे हा युवक गुरूवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास गजराजनगर येथील पेट्रोल पंपाजवळ असताना अचानक त्याच्या डोक्यात गोळी घुसून तो जखमी झाला. त्याच्यावर अनोळखी व्यक्तीने गोळीबार केला असल्याची शक्यता सुरूवातीला वाटत होती. स्थानिकांनी घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली.

सहा. निरीक्षक सानप पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी माहिती घेतली असता बीटीआर येथे रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या सरावादरम्यानची गोळी मांजरे याच्या डोक्यात घुसली असल्याचे लक्षात आले.

दरम्यान, जखमी किरण मांजरे याला छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया करून गोळी बाहेर काढली आहे. घटनेची माहिती मिळताच नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक संपतराव भोसले, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सहा. निरीक्षक नितीन रणदिवे, मुजावर यांनी रुग्णालयात धाव घेतली. अधिक तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे