
नगरच्या राजकारणातील दिग्गज व्यक्तिमत्त्व आणि माजी आमदार अरुण काका जगताप यांची तब्येत बिघडल्याने त्यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीबाबत काही काळ उलटसुलट चर्चा सुरू होत्या.
अरुण काका जगताप यांची प्रकृती स्थिर असून, ते हळूहळू रिकव्हर होत आहेत. अरुण काका जगताप हे नगरच्या राजकीय पटलावरील एक प्रभावी नाव आहे. त्यांच्याशिवाय नगरचे राजकारण अपूर्ण मानले जाते. त्यांनी आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत निष्ठावंत कार्यकर्त्यांची मोठी फौज उभी केली असून, त्यांचा चाहता वर्गही तितकाच मोठा आहे.
जेव्हा त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याची बातमी समोर आली, तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले. अनेकांनी सोशल मीडियावर आणि प्रत्यक्षात त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केल्या. त्यांच्या समर्थकांसाठी ही बातमी म्हणजे मोठा दिलासा आहे.
सध्या पुण्यातील खासगी रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वैद्यकीय सूत्रांनुसार, त्यांची प्रकृती स्थिर झाली असून, ते उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. या बातमीमुळे त्यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांमध्येही आशेचा किरण निर्माण झाला आहे.