विश्व हिंदू परिषदेचे 200 भाविक निघाले अयोध्येला प्रभू रामाच्या दर्शनाला…
अहिल्यानगर

आयोध्या व काशी धाम येथे अहिल्या नगर चे 61 यात्रेकरु रवाना..आयोध्या धाम हिंदूंची पवित्र यात्रा-बाळासाहेब भुजबळ ..
प्रभू श्रीरामाचे मंदिराचे भूमिपूजन 2023रोजी मोठ्या थाटामाटात संपन्न झाले.हिंदुंचे स्वप्न 550 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पुर्ण झाले आहे.रामभक्तांना प्रभू श्रीराम चंद्र यांच्या दर्शनाची ओढ लागली आहे.म्हणून अहिल्यानगर चे रामभक्त अयोध्या धाम व काशी विश्वेश्वर धाम दर्शनासाठी जात आहे.अयोध्या धाम ही हिंदूची पवित्र यात्रा आहे.असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे ओबीसीचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी केले आहे.
अहिल्या नगरचे 61 यात्रेकरू व पुणे येथून 150 यात्रेकरू आयोध्या धाम व काशीधाम यात्रेकरिता रवाना झाले आहेत.
अहिल्यानगर रेल्वेस्थानक येथे आयोध्या धाम येथे जाणाऱ्या यात्रेकरूंचे नगरकरांनी उस्फूर्त स्वागत केले.याप्रसंगी बन्सी महाराज मिठाईवाले,हरिभाऊ डोळसे, अखिल भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष निलेश चिपाडे,विश्व हिंदू परिषदेचे जेष्ठ कार्यकर्ते गजेंद्र सोनवणे,विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमोल भांबरकर,रमेश शेरकर,चंद्रकांत सखाराम पुंड ,सुर्यकांत कांडेकर,विनोद पुंड ,मनोज भुजबळ, रोहित पठारे, बाळासाहेब जावळे , नारायण इवळे,प्रकाश इवळे आदी उपस्थित होते.
ग्वाल्हेर किल्ला येथे अहिल्यानगर येथील भाविकांनी जावून माहिती घेतली.या नंतर यात्रेकरूंनी आयोध्या धाम, सिद्धपीठ,श्री हनुमान गढ़ी, श्री राम मंदिर, कनक महाल, दशरथ महल,शिप्रा घाट,श्री काशी विश्वेश्वर मंदिर,श्री कालभैरव मंदिर, श्री ढुंडिविनायक गणपती मंदिर,श्री काशी विश्वेश्वर मंदिर, श्री माता अन्नपूर्णा मंदिर,श्री संकटमोचन हनुमान मंदिर, श्री महामृत्युंजय मंदिर,श्री गंगा महाआरती करण्यात येणार आहे.
या यात्रेसाठी नाना सावंत व भक्ती ताई साळवी यांचे मार्गदर्शन लाभले.