ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

शिरूर तालुक्यात चौथीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग नराधम शिक्षकाचे निलंबन

अहिल्यानगर प्रतिनिधी - संगीता खिलारी

शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील एका गावामधे चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या नराधम शिक्षकावर अखेर शिक्षण विभाग प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे.

पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने संबंधित शिक्षक आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे त्या शिक्षकाची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहेबाळू धोंडीबा गुंजाळ (वय -४५,रा.शिरूर,जि.पुणे)असे संशयित नराधम शिक्षकाचे नाव आहे.त्याच्या विरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शिक्षक व विद्यार्थी या नात्याला काळीमा फासणारी घटना शनिवारी उघड झाली होती.त्याबाबत पीडित मुलीच्या पालकांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नराधम शिक्षक गुंजाळ हा चौथीत शिकणाऱ्या मुलीला कायमच वर्ग झाडून काढण्यास सांगत असे.

मुलगी वर्ग झाडताना त्याचदरम्यान नराधम शिक्षक मुलीशी अश्लील चाळे करीत होता.याबाबत कुणाला काही सांगितल्यास शिक्षकाने पीडित मुलीला पट्ट्याने मारण्याची धमकी वेळोवेळी दिली होती.

या सर्व प्रकारामुळे सदर पीडित मुलगी शाळेत जाण्यास घाबरत होती.त्यामुळे पालकांनी मुलीला विश्वासात घेत विचारपूस केल्यामुळे मुलीने सर्व प्रकार पालकांना सांगितला,त्यानंतर शिक्षकाचा खरा चेहरा समोर येऊन धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

या सर्व प्रकारानंतर पालकांनी संबंधित शाळेला टाळे ठोकले होते व शिरूरच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.त्यामुळे शिक्षण विभागाने चौकशी समिती नेमून नराधम शिक्षकाची चौकशी केली होती.चौकशीनंतर शिक्षक दोषी आढळल्याने त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली असल्याचे शिरूरचे गट शिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांनी सांगितले.

पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत गिरी करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे