ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

सिनेअभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्या उपस्थितीत अन्वी घाटगे यांना जागतिक विक्रमवीर गिर्यारोहक कार्याबद्दल विश्वनाथ फौंडेशनचा महाराष्ट्ररत्न गौरव पुरस्कार प्रदान

पुणे

विश्वनाथ फाउंडेशनच्या वतीने आयोजित महाराष्ट्ररत्र गौरव पुरस्कार २०२५ मध्ये अन्वी अनिता चेतन घाटगे यांना जागतिक विक्रमवीर गिर्यारोहक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार सिनेअभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ५० सत्कारमूर्तीना महाराष्ट्ररन्न गौरव पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला.

विश्वनाथ फाउंडेशन, दैनिक शिवजागर आणि इन्फोडेंड टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, गंज पेठ, पुणे येथे २८ फेब्रुवारी २०२५ रोजी या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन ॲड. शंकर चव्हाण यांनी केले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख उद्घाटक म्हणून प्रसिद्ध सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड उपस्थित होत्या.

प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध सिने दिग्दर्शक ओमकार माने, सामाजिक कार्यकर्त्या स्मिता चावडा, कांचन आहेर आणि उद्योजिका सुजाता चिंता आदी मान्यवरांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशस्विनी पाटील यांनी केले.  कु. सृष्टी शंकर चव्हाण हिने स्वागत गीत सादर करून सहभाग नोंदवला.

दीपप्रज्वलना नंतर स्वागत गिताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर प्रमुख उद्घाटक व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.

पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्ररत्न गौरव पुरस्कार २०२५ विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रदान करण्यात आला. हा सोहळा अत्यंत रंजक आणि अविस्मरणीय ठरला.

प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात विश्वनाथ फाउंडेशन, दैनिक शिवजागर आणि इन्फोडेंड टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या संस्थांचे विशेष कौतुक केले. तसेच संयोजक ॲड. शंकर चव्हाण यांच्या कार्याचा गौरव करत त्यांनी समाजातील खऱ्या हिरांना शोधून त्यांचा सन्मान करण्याचे कार्य पुढेही सुरू ठेवावे अशी भावना व्यक्त केली.

यावेळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड म्हणाल्या, समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना असे पुरस्कार मिळणे, ही एक मोठी प्रेरणादायी गोष्ट आहे. तसेच, प्रसिद्ध सिने दिग्दर्शक ओमकार माने यांनीही या सोहळ्याचे विशेष कौतुक करत, “समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना सन्मानित करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य हे समाज परिवर्तनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे मत व्यक्त केले.

उद्योजिका सुजाता चिंता यांनीही सर्व सत्कारमूर्तीना शुभेच्छा देत, “आपले कार्य यापुढेही अधिक जोमाने चालू ठेवा आणि समाजसेवेसाठी अधिक मोठे योगदान द्या, असे सांगितले. तसेच चंद्रपूर येथील आयएचआरएफ फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा स्मिता चावडा यांनी पुरस्कार विजेत्यांना शुभेच्छा देत, “आपल्या क्षेत्रात पुढेही मोठे यश संपादन करून समाजात आदर्श निर्माण करा, असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमासाठी विश्वनाथ फाउंडेशनचे अध्यक्ष शेषेराव हनुमंतराव चव्हाण हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोज नासाठी योगदान दिलेल्या प्रत्येकाचे संयोजकांकडून आभार मानण्यात आले. हा दिमाखदार सोहळा उपस्थित सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला.

या सोहळ्यात उमेश दत्तात्रय पोखरकर (गोरक्षक), गणेश काशिनाथ गुळवे गुरुजी, अन्वी अनिता चेतन घाटगे, शेख मुख्तार शेख फकीर अहेमद, शशिकांत देशमुख व डॉ. वृषाली देशमुख, राजाभाऊ जोथ, डॉ. रमेश मनोहर, सालोमन आबाजी साठे, अनिल पॉल सर, सचिन मधुकर पवार, बाबासाहेब पोटभरे, सचिन सुरेशराव दिवाण, प्रदीप सुमन भाउसाहेब शिंदे, मंगेश नारायणराव मुळी, मनिष जैन, मा. जुईली कुलकर्णी-देशपांडे, डॉ. रविंद्र वाळुजी सुर्यवंशी, श्रुती सुनिल पवार-जगताप, भागवत रामकृष्ण मसने, मीरा तुकाराम जाधव, नंदकुमार निवृत्ती जगताप, चंद्रकांत रंगनाथ कांबळे, डॉ.सुनिल नामदेव साठे, सुभाष ज्ञानदेव भानुसघरे (सर), धनराज आंबादास सोनवणे, जनाबाई नरहरी काकडे, मनेश बब्रुवान गोरे, रोहिनी खंडेराव चामले, आरती दयानंद चव्हाण, सुरेश ‘भगवानराव यादव, डॉ. आलम हसरत खान, वैभव विठ्ठल गायकवाड, चेतन अर्जुन वडर, ज्ञानेश्वर गणेश निलंगे, अशोक विठ्ठल पाटील, माथुरी प्रविण गुरव, डॉ. कल्पना मनसुब मोटे, सुप्रिया प्रविण कुंभार, आकाश छोटूलाल वाघ, धनंजय निळकंठ पाटील, अक्षयकुमार पोपट डावरे, अमोल विठ्ठलराव जोगदंड, श्वेता विकास वाडेकर, भारती मगर कोल्हे व संतोष कोल्हे, सोनम गोवर्धन तांदळे, सचिन धनराज साखरे, सिने दिग्दर्शक ओंकार हनुमंत माने, प्राचार्य. डॉ. आप्पाराव वासुदेव हिंगमीरे, सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि अविनाश शाळीग्राम जाधव यांना मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्ररत्न गौरव पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे