बालक मंदिर महिला मंडळ या शाळेमध्ये 27 फेब्रुवारी 2025 रोजी मराठी गौरव दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांचा अतिशय सुंदर असा कार्यक्रम संपन्न झाला..
अहिल्यानगर- मराठी गौरव दिन उत्साहाने संपन्न..

बालक मंदिर महिला मंडळ या शाळेमध्ये 27 फेब्रुवारी 2025 रोजी मराठी गौरव दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांचा अतिशय सुंदर असा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या सौ मुग्धा शुक्रे या होत्या..
बालवयापासूनच हे संस्कार विद्यार्थ्यांकडून करून घेतल्यानंतर त्यांची मराठी मायबोली नक्कीच समृद्ध होईल. राष्ट्रभाषा, ज्ञानभाषा व इतर भाषेत पारंगत होण्यासाठी प्रथम मातृभाषेचे परिपूर्ण ज्ञान असायला हवे .असे त्यांनी मनोगतातून व्यक्त केले .
बालक मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अस्मिता शूळ यांनी या कार्यक्रमाची नेमकी संकल्पना प्रास्ताविकातून मांडली .
वयोगटानुसार विद्यार्थ्यांवर मराठी व्याकरणाचे धडे हसतखेळत गिरवले तर मातृभाषेतून सादरीकरण व प्रकटीकरण उत्कृष्टपणे करू शकतील असे त्यांनी सांगितले . यामध्ये इ १ली बालगीते इ .२री विरुद्धार्थी शब्दांचा खेळ इ .३री म्हणींची अंताक्षरी इ .४थी वाक्प्रचार ,इ . ५वी काव्यवाचन इ. ६वी साहित्यिकांची ओळख व इ ७वी नाटिका .अशा पद्धतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे मराठी दिना निमित्त सादरीकरण केले .
महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ ज्योतीताई केसकर यांनी अध्यक्षीय भाषणातून असे सादरीकरण वारंवार घडावे अशी अपेक्षा व्यक्त केली .
परिवर्तन प्रतिष्ठानच्या सौ प्रज्ञा असनीकर यांनी रोजच्या बोलीभाषेतील इंग्रजी शब्दांना असणारे मराठी प्रतिशब्द शोधा असे आवाहन केले . या कार्यक्रमाच्या प्रसंगी महिला मंडळाच्या सचिव सौ ज्योती कुलकर्णी तसेच शिल्पा रसाळ ,सौ .मेधा धोपावकर सौ गौरी मुळे ,पुष्पा चितांबर , अनुराधा देशमुख शकुंतला पाटील, सौ मीनल गंधे या उपस्थित पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना उत्तेजन दिले व कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ .मुग्धा घोटणकर , सजावट सौ सीमा कवाष्टे ,प्रणाली पाठक ,पाहुण्यांची ओळख सौ मनिषा कुलकर्णी ,आभार सौ वैशाली सातपुते यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अश्विनी मेंद्रे, निरूपमा देशपांडे , प्रतिक्षा आव्हाड ,उज्वला क्यादर यांनी परिश्रम घेतले .