ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

दिल्लीचे साहित्य संमेलन गाजवणाऱ्या मेहमूदा धोंडफोडे – शेख यांच्या लाजवंती या काव्यसंग्रहाचे महाराष्ट्र बुक ऑफ द वर्ल्ड मध्ये नोंद

देहू प्रतिनिधी - देहूच्या कन्या मेहमूदा गुलाब धोंडफोडे - शेख या हर हुन्नरी कवयित्रीचे दिल्ली मधील 98 व्या साहित्य संमेलनामध्ये कविता गाजल्या..

माझे गाव ही त्यांची कविता साहित्य संमेलन मधील प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली, आणि जगद्गुरू संत तुकारामांचा जय जयकार या निमित्ताने दिल्लीमध्ये प्रचंड उत्साहात झाला.

प्रथम हाजी असणारे गुलाब धोंडफोडे यांची मेहमूदा कन्या, मुस्लिम बँकेचे अधिकारी आणि देहू काँग्रेसचे माजी अध्यक्ष रशीद धोंडफोडे यांच्या त्या भगिनी,देहूतील सामाजिक आणि धार्मिक कार्यात या कुटुंबातील सर्व सदस्यचा मोलाचा वाटा असतो.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये मेहमूदा या लेखनिक पदावर सेवेत होत्या.. स्वर्गीय शालेय शिक्षण मंत्री रामकृष्ण मोरे साहेब यांनी या मुलीची प्रतिभा आणि प्रतिमा ओळखून शिक्षण मंडळात सेवेची संधी दिली होती. हे कुटुंब अनेकदा वारीत सहभागी झालेले आढळते, स्वतःला वारकरी संप्रदायाचे पाईक समजून हे कार्यरत असतात.

दरवर्षी पालखी सोहळ्यामध्ये अन्नदान व जी काही सेवा असेल ती करण्यात ते धन्यता मानतात.. त्यांचे बंधु रशीद धोंडफोडे हे शिवजयंती उत्सव समितीचेही अध्यक्ष होते, हनुमान मित्र मंडळाचेही अध्यक्ष असताना त्यांनी गणपती उत्सवात आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. मेहमूदा धोंड फोडे – शेख यांची आत्तापर्यंत तीन काव्यसंग्रह प्रकाशित झाले असून, गुलपरी, काव्यलतिका, लाजवंती हे त्यांचे काव्य संग्रह.महाराष्ट्रातील प्रत्येक काव्य संमेलनाला त्यांची हजेरी असते, नॅशनल चॅम्पियन पैलवान तानाजी काळोखे हे मेहमूदाला बहिणाबाई असे संबोधतात.मावळ काँग्रेस समन्वयक, मा.अध्यक्षा वनिताताई देशकर यांनी सांगितले की मेहमूदाताई ह्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या असून त्यांच्या लाजवंती ला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत, हे कुटुंब देहूच्या मातीशी एकनिष्ठ असून, सामाजिक कार्यात अग्रेसर असते.

टाटा मोटर्सचे उपाध्यक्ष तथा देहुचे माजी उपसरपंच प्रकाश हगवणे यांनी सांगितले की यांची काव्यमैफल त्यांनी अनेकदा ऐकले असून ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवराय यांच्यावर जास्त कविता करतात, सामाजिक कार्यकर्ते महेश मोरे यांनी मेहमूद शेख यांच्या बद्दल बोलताना सांगितले की सरळ आणि मनाला भावेल अशा काव्यपंक्ती या ताई करतात त्यामुळे त्यांचा आदर देहूकर म्हणून आम्हाला नक्कीच अभिमान आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले की देशाची राजधानी दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले, यामध्ये श्रीक्षेत्र देहूच्या सुकन्या मेहमुदा धोंडफोडे -शेख यांनी देखील सहभाग घेतला.

काव्य संमेलनामध्ये माझे गाव हे कविता रसिकांच्या पसंतीस पडली व त्यांना भरपूर प्रतिसाद मिळाला. साहित्य परिषदेचा पुरस्कार देखील मिळाला त्याबद्दल समस्त देहू करांच्यावतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे