ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

8 व 9 मार्च रोजी हैद्राबाद येथे अखिल भारतीय पद्मशाली समाजाची महासभा

अहिल्यानगर

अखिल भारत पद्मशाली संघम हैद्राबाद च्या वतीने दिनांक 8 व 9 मार्च रोजी हैद्राबाद येथे 17 वे व तेलांगाणा पद्मशाली संघम चे 8 वे अधिवेशन होणार असल्याची माहिती पद्मशाली समाजाच्या वतीने देण्यात आली.

नुकतेच अखिल भारत पद्मशाली संघम चे अध्यक्ष कंदागटला स्वामी पद्मशाली, माजी अध्यक्ष श्रीधर सुंकुरवार व जनरल सेक्रेटरी गड्डम जगन्नाथम पद्मशाली अहिल्यानगर येथे अधिवेशनाचे आमंत्रण देण्यासाठी आले असता पद्मशाली समाजाचे वतीने सर्व पदाधिकाऱ्यांचा मान सन्मान करण्यात आले.

या वेळी पद्मशाली समाजातील कार्यकर्ते गणेश विद्ये, श्रीकांत छिंदम, श्रीनिवास बोज्जा, दत्तात्रय राजकोंडा, ऍड. राजेंद्र गाली, संजय वल्लाकट्टी, विनायक गुडेवार, विनोद बोगा, राजू म्याना, अमित बुरा, श्रीनिवास रासकोंडा, पुरुषोत्तम बुरा, गणेश चेन्नूर, सागर सब्बन, विलास गुडा, सुरेश म्याना आदी उपस्थित होते.

या वेळी अखिल भारतीय पद्मशाली संघम चे जनरल सेक्रेटरी गड्डम यांनी अधिवेशना बाबत विस्तृत माहिती दिली व अध्यक्ष कंदागटला स्वामी पद्मशाली यांनी सदर अधिवेशनाला तेलंगणा चे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी व इतर काही मंत्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून अधिवेशनाला पद्मशाली समाजातील 20 ते 25 हजार समाज बांधव उपस्थित रहाणार असल्याची माहिती दिली व अहिल्यानगर येथील पद्मशाली समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत दत्तात्रय रासकोंडा यांनी केले तर आभार विनोद बोगा यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे