अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याच्या मानसिकतेत, आता सुरेश धस मागे जातील असं वाटत नाही- बबनराव घोलप
बबनराव घोलप यांनी धनंजय देशमुखांची भेट घेतली

किसन बी पवार – माजलगाव (प्रतिनिधी)
संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी शिवसेनेचे माजी समाज कल्याण मंत्री तथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप हे मस्साजोग येथे आले होते या वेळी पत्रकारांशी वार्तालाप करताना म्हणाले की संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे या प्रकरणी पालकमंत्री अजित पवार हे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याच्या मानसिकतेत आहे तर दुसरी कडे युतीचे आ सुरेश धस मागे जातील असे वाटत नाही असे म्हणत आपण शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे लवकरच संतोष देशमुख कुटुंबाच्या भेटीला येऊन या प्रकरणी न्याय भूमिका बाजावतील असे म्हणत आम्ही पूर्ण ताकतीने संतोष देशमुख कुटुंबा सोबत आहोत असे सांगितले
या वेळी त्यांच्या समवेत राज्य सचिव गोतीश , स्वयं सचिव अनिल कानडे , लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे स. सुत गिरणी अध्यक्ष विजय ठोंबरे , व बीड जिल्हाध्यक्ष नानासाहेब घोडके ,पद्माकर कांबळे, जिल्हा सचिव ऑड दत्ता जाधव, वसंत वाघमारे आदींची उपस्थिती होती..