ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

शरीरा वेगळे धड करून एकीकडे तर शीर एकीकडे फेकले संशयित म्हणून पोलिसांनी एकाला ताब्यात

अहिल्या नगर प्रतिनिधी - संगीता खिलारी

शेवगाव नगर बाळासाहेब खेडकर शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील पहिलवान बाबा मंदिरातील दिनांक 26 जानेवारी पासून बेपत्ता झालेले पुजारी नामदेव रामा दहातोंडे यांची झालेली निर्गुण हत्या झाल्याचे उघड झाले असून, रात्री उनके एका विहिरीत सापडले असून आज शुक्रवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास, दुसऱ्या विहिरीत उर्वरित शरीर सापडले आहे .

या घटनेमुळे बोधेगाव परिसरात एकच खळबळ उडाली असून, दत्त ग्रामस्थांनी शनिवारी बंदची हात दिली आहे. शेगाव येथून पैलवान बाबा मंदिर गावापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर एक बुर्जी लागत असून मंदिरात गेल्या 14 वर्षापासून सेवा करत असलेले पुजारी नामदेव रामा दहातोंडे.

हे दिनांक 26 तारखेपासून गायब होते. त्या संदर्भात एकनाथ घोरतळे यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यांचा शोध सुरू असतानाच, गुरुवारी मंदिराच्या सुशीलाबाई पाटील बुवा तांबे यांच्या विहिरीजवळ गुरुवारी रात्री मोठी दुर्गंधी येऊ लागल्याने त्या विहिरीत पाहिले असता, त्या ठिकाणी दहातोंडे यांचे शिर (अर्थात मुंडके) आढळून आले.

या घटनेची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. त्यानंतर बोधेगाव पोलीस दूरक्षेत्राचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी ते मुंडके रात्री उशिरा विहिरी बाहेर काढले. या घटनेमुळे बोधेगाव परिसरात एकच खळबळ उडाली. तसेच भाविकांत मोठा असंतोष निर्माण झाल्याने, घटनेची माहिती मिळताच आज शुक्रवारी, दुपारी घटनास्थळी पोलीस अधीक्षक शांत खैरे शेवगाव विभागाचे उपाधीक्षक सुनील पाटील. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ठसे तज्ञ आधी पथक घटनास्थळी दाखल होऊन या हत्तेचा शोध घेत असतानाच, त्यानंतर आज शुक्रवारी सायंकाळी मंदिरापासून काही अंतरावर अविनाश कदम यांच्या विहिरीतून दुर्गंधी येत असल्याने पहाणे केली असता दहातोंडे यांचे (धड म्हणजे उर्वरित शरीर) आढळून आले.

मयत दहातोंडे हे मूळ नागलवाडी तालुका शेवगाव येथील रहिवासी आहेत. ते विवाहित असून त्यांना दोन मुले आणि पत्नी एक मुलगी असा परिवार आहे. या हत्येचा निषेध करून सखोल तपास करीत आहे. हल्लेखोरांना तातडीने अटक करावी. या मागणीसाठी तसेच या गंभीर घटनेचा तपास एलसीबी कडे देण्यात यावा या मागणीसाठी विविध संघटनांनी. बोधेगाव बंदाजी कडकडीत हाक दिली आहे. या हत्तीसाठी संशयित म्हणून एका जणाला ताब्यात घेण्यात आले आहे. ही क्रूर हत्या का केली गेली या मागचे नेमके कारण काय, आणि कोणी केले याबाबत ग्रामस्थ, व भाविकांत उलट सुलट चर्चा चालू आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी या पहिलवान बाबा मंदिरातील मूर्तीची तोडफोड करून विटंबना करण्याची घटना घडली होती. त्या संदर्भात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. अशी माहिती पोलिसांनी दिली.

या हत्तीचा तपास लावणे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास प्रक्रिया चालू आहे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे